मानोरा : शहरातील शासकीय ग्रामीण रुग्णालयात (Government Rural Hospital) करण्यात आलेल्या इमारतीची डागडुगी तसेच वॉल कंपाऊंड दुरुस्ती, कर्मचारी क्वार्टर दुरुस्ती आणि नवीन लेबर रूमचे सुरू असलेले विकास कामे शासकीय अंदाजपत्रकाला डावलून थातुरमातुर पद्धतीने सा. बां. उपविभागाचे उपअभियंता, शाखा अभियंता आणि कंत्राटदार हे कमिशन लाटून संगनमतीने करत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात अर्धा तास वाहतूक ठप्प!
याबाबत चौकशी करून दोषीविरुध्द कार्यवाही करावी, यासंदर्भात चौकशी करून कार्यवाही करावी, यासंदर्भात दि. ७ जानेवारीला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रहार जनशक्ती पक्ष, गोरसेना, परिवर्तन संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शासन व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून आंदोलन छेडण्यात छेडण्यात आले. तब्बल अर्धा तासानंतर, महसूल विभागाने (Department of Revenue) सबंधित विभागाचे शाखा अभियंता यांना पाचारण करून कामाची चौकशी करून गुणनियंत्रण विभागामार्फत तपासणी करून दोषींविरुद्ध कार्यवाही करण्याचे लेखी पत्राचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
लेखी पत्राच्या आश्वासनाने आंदोलन मागे!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात (Statement) नमूद केले आहे की, सार्वजनिक बांधकाम उपविभाग मानोरा अंतर्गत शहरातील शासकीय ग्रामीण रुग्णालयात शासनाकडून (Government) मंजूर झालेल्या निधीमधून १० लक्ष रुपयाचे इमारतीची डागडुगी तसेच वॉल कंपाऊंड दुरुस्ती, १० लक्ष रुपयाचे कर्मचारी क्वार्टर दुरुस्ती आणि १० लक्ष रुपयाचे नवीन लेबर रूमचे विकास काम करण्यात आले आहे. अंदाजे ३० लक्ष रुपयाच्या विकास कामात सिमेंटचा अल्प वापर, रेतीचा वापर न करता डस्टचा वापर करून जुनी खिडक्या व जुनेच पि यू सी पाईपचा वापर करून पाईप बसविले आहे. लेबर रूमचे कामात मातीचा वापर करण्यात आल्याने इमारतीचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे झाले असुन सुरू असलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात येत आहे.
कर्मचारी क्वार्टर दुरुस्ती कामामध्ये संडास, बाथरूमचे काम कंत्राटदाराने थातूरमातूर केले असुन निकृष्ठ दर्जाची स्टाईलचा वापर करण्यात आली आहे. तसेच क्वार्टर दुरुस्ती करताना रेती टाकून बेड करणे आवश्यक असताना निव्वळ डस्ट व सिमेंट टाकून काम पूर्ण केले आहे. सदरील विकास कामात झालेल्या निकृष्ठ दर्जाच्या कामाची सखोल चौकशी करून सबंधित शाखा अभियंता व कंत्राटदार यांच्या विरुद्ध कार्यवाही करावी तसेच काम मंजूर करण्यात आलेल्या संस्थेचा काळ्या यादीत समावेश करून दोषी विरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, यासंदर्भात २० दिवसापूर्वी तक्रार निवेदन देऊनही वरिष्ठ स्तरावरून कोणत्याही प्रकारची चौकशी न झाल्याने मानोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करणार असे इशाऱ्याचे निवेदन संबंधितांना पाठवून देखील चौकशी झाली नाही.त्यासाठी आंदोलन कर्त्यानी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आठवडी बाजाराच्या दिवशी चक्का जाम आंदोलनाला शासन व प्रशासनाच्या विरोधात घोषणा देऊन सकाळी ११. ३० सुरुवात झाली. यावेळी आंदोलनस्थळी नायब तहसीलदार मधूकर अस्टूरे, सहाय्यक महसूल अधिकारी संदीप आडे, महसूल विभागाचे कर्मचारी विशाल डुकरे आदींनी संतप्त आंदोलनकर्त्याना शांत करत सा. बां. उपविभागाचे शाखा अभियंता विवेक पवार यांना पाचारण केल्यावर चौकशी करून कार्यवाही करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. आंदोलन कर्ता केवळ आश्वासनावर न थांबता न्यायासाठी आक्रमक होत असल्याने कामाची चौकशी करून क्वालिटी कंट्रोल विभागामार्फत कामाची चौकशी करण्याचे लेखी पत्र दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ता प्रा. ओम बलोदे, गोरसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाल चव्हाण, शेतकरी नेते मनोहर राठोड, प्रहारचे तालुकाध्यक्ष प्रशांत धोत्रे, प्रहारचे माजी तालुकाप्रमुख शाम पवार, पोहरादेवीचे सुधाकर राठोड महाराज, प्रहार रुग्णकल्याण समिती वाशिमचे जिल्हाध्यक्ष नितेश लवटे, प्रहारचे उपतालुकाप्रमुख युवराज राठोड, सौरभ राठोड, समाजसेवक गोपाल लवटे, उमेश म्हातारमारे, सुरज शिंदे, सूरज म्हातारमारे, ऋतिक मालवे, करण ठाकूर, अमोल लोंढे, रवी शेट्टे, रतन राठोड, हर्षदीप डाखोरे, गणेश पुरी, अमित लोखंडे आदीसह इतर नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आंदोलन परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलिसांनी आंदोलस्थळी कडेकोट पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
No comments:
Post a Comment