Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Monday, February 2, 2026

वीजबिल भरणार नाही, तर वीजही मिळणार नाही! ६ हजार थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित


वाशीम, दि.०२ फेब्रुवारी २०२६: (साप्ता. दिग्रस एक्सप्रेस)
       अकोला परिमंडळाअंतर्गत महावितरणने  वीजबिल थकबाकीदारांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली असून वीजबिल भरणार नाही, तर वीजही मिळणार नाही, अशी कठोर भूमिका घेत वारंवार आवाहन करूनही बिल भरण्यास प्रतिसाद न देणाऱ्या अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील ६ हजार ३८७ ग्राहकांचा वीजपुरवठा जानेवारी  महिन्यात खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे महावितरणची कटू कारवाई टाळण्यासाठी बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी केले आहे.

         अकोला परिमंडळात वीजबिलांच्या प्रचंड थकबाकीमुळे महावितरणसमोर आर्थीक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील लघुदाब वर्गवारील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक व इतर वर्गवारीतील ११ लाख ६७ हजार १८२ ग्राहकांकडे  जानेवारी महिन्याचे चालू बिल पकडता ३४५ कोटी रूपयाची थकबाकी होती. त्यापैकी जानेवारी महिन्यात ११२ कोटी रूपये वसूल झाले आहे, अद्याप २३३ कोटी थकीत आहे. 

     यात अकोला जिल्ह्यातील ४ लाख १६ हजार ३३७ ग्राहकांकडे १२६ कोटी ६३ लाख, वसूल मात्र ४६ कोटी ४५ लाख रूपये, बुलडाणा जिल्ह्यातील ५ लाख २९ हजार ६८२ ग्राहकांकडे १५९ कोटी ७२ लाख एकुण थकबाकी आणि वसूली ४६ कोटी ३१ लाख, वाशिम जिल्ह्यातील २ लाख २१ हजार १६३ ग्राहकांकडे ५८ कोटी ७९ लाख रुपयांची थकबाकी असतांना जानेवारी महिन्यात केवळ १८ कोटी ९५ लाख रूपयेच वसूल झाले आहे. वारंवार आवाहन करूनही अनेक ग्राहकांनी वीजबिल न भरल्याने महावितरणच्या थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

त्यामुळे महावितरणने कठोर भूमिका घेत आता थकबाकीदारांची वीजजोडणी खंडित करण्याची धडक मोहीम सुरू केली आहे. जानेवारी महिन्यात अकोला जिल्ह्यातील १ हजार ३२१, बुलडाणा जिल्ह्यातील ४ हजार ३५२ आणि वाशिम जिल्ह्यातील ७१४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर