Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Monday, February 2, 2026

संत सेवालाल महाराज जयंतीच्या औचित्याने बंजाराबांधवांची आढावा बैठक


दिग्रस (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)

               थोर समाजसुधारक तथा बंजारा समाजाचे आराध्य दैवत जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांच्या १५ फेब्रुवारी रोजी पार पडणाऱ्या जयंतीच्या औचित्याने श्री संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने बंजारा समाज बांधवांची आढावा बैठक दि. १ फेब्रुवारी रोजी दिग्रस शहरातील कान्होबा पेट्रोल पंपासमोरील चाय- चस्का हॉटेलच्या हॉलमध्ये  संपन्न झाली. या बैठकीत येणाऱ्या जयंती उत्सवाचे नियोजन, कार्यक्रमांची रूपरेषा तसेच समाजासमोरील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संत सेवालाल महाराज यांच्या विचारांचा समाजात प्रचार व प्रसार करण्यावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

              जयंतीनिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्याबाबत एकमत झाले. जयंती उत्सव शांततेत, उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. बैठकीत समाजातील युवकांनी संघटनेच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, समाजाच्या प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करावे, असे मार्गदर्शन करण्यात आले. शिवाय समाजातील  विकासात्मक प्रश्नांवरही चर्चा झाली. या आढावा बैठकीस समाजातील ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंती कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

No comments:

Post a Comment

फॉलोअर