दिग्रस:- (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांच्या ७४० व्या पुण्यतिथी निमित्य सोनार समाज दिग्रसच्यावतीने मोफत दंतरोग निदान शिबिर आणि अभिवादन कार्यक्रम घेऊन पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
दि. ४ फेब्रुवारीला सकाळी १०.०० वाजता पासून पुण्यतिथी निमित्त डॉ. सुरेंद्र फेदुजवार यांच्यातर्फे मोफत दंतरोग निदान शिबिर राबवण्यात आले. याचा अनेक रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिरासाठी डॉ. फेदुजवार यांचा सोनार समाज बांधवातर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सुवर्णकार दत्त मंदिर संस्थान दिग्रस येथे ७.०० वाजता महाराजांना अभिवादन करण्यात आले. संत नरहरी महाराज यांच्या मुर्तीचे पूजन सोनार सेवा महासंघ दिग्रसचे अध्यक्ष सुरेश शहाणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी महाराजांना सामूहिक अभिवादन केले. अभिवादन कार्यक्रमानंतर दिग्रस मधील सोनार समाजाच्या एकतेसाठी नेहमी प्रयत्न करणारे व समाजात विविध कार्यक्रम आणि उपक्रम घेणारे सौरभ टाक यांचा सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार संदीप रत्नपारखी यांच्यावतीने 'भगवत गीता' ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्वांना प्रसाद वितरित करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
यावेळी उपस्थित युवा अध्यक्ष सौरभ टाक, धनंजय घोडके, संदीप रत्नपारखी, डॉ. सुरेंद्र फेदुजवार, जगन्नाथ लोळगे, सुमित शहाणे, अमित शहाणे, सौ. ज्योती शहाणे, सौ.उज्वला महामुने, श्रीमती भावना मुंडलीक, सौ. रेवती रत्नपारखी, प्रफुल दिक्षित, कैलास गोटे, दिनेश बेदरकर, रुपेश तळोकार, प्रमोद दिक्षित, सचिन रत्नपारखी, विजय दुरतकर, जयदीप सावळकर, सोहम मुंडलीक, सुरज मेटकरी, अमोल झरकर, आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment