Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Wednesday, February 4, 2026

समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री उभारणीसाठी. टप्प्याटप्प्याने वाहतूक थांबविण्यात येणार


वाशिम,दि.४ फेब्रुवारी (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर वाशिम व बुलढाणा जिल्ह्यात गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत प्रस्तावित करण्यात आले आहे. हे काम दि. ७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी  या कालावधीत ३५ टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे.

वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड), मंगरुळपीर, मालेगाव तसेच बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातून जाणाऱ्या कि.मी. १७८+९०० ते २९०+४०० या दरम्यानच्या समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत ही गॅन्ट्री उभारण्यात येणार आहे.

या कामाच्या प्रत्येक टप्प्याच्या ठिकाणी संबंधित वाहिनीवरील वाहतूक ४५ ते ६० मिनिटांच्या कालावधीसाठी पूर्णतः थांबविण्यात येणार आहे.

 संबंधित टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर द्रुतगती मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येईल.

या कालावधीत महामार्गाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी व्यवस्था लक्षात घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन  तुषार अहिरे, जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मर्या.), मुंबई यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर