मानोरा (रुई)( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत गजानन महाराज प्रगट दिना निमित्त रुई येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या रविवार, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता मिरवणूक तर सायंकाळी ५ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
ही मिरवणूक रुई गावातून भक्तिमय वातावरणात काढण्यात येणार असून, त्यानंतर हनुमान मंदिर, रुई येथे सर्व भाविक-भक्तांसाठी महाप्रसाद वितरित करण्यात येणार आहे.
या पवित्र कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बजरंग बली हरिपाठ मंडळ, रुई यांच्या वतीने सर्व भाविक-भक्तांना करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment