Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, February 6, 2026

गोंडवडसा येथे रेणुका देवी बायो सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन; शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

माहूर (गोंडवडसा ) (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नटवर्क)
दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी गोंडवडसा शेत सर्वे नंबर २३५ येथे रेणुका देवी बायो सीएनजी प्रा. लि. तर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने तसेच प्रस्तावित सीएनजी कारखान्याच्या उभारणीसाठी भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर भूमिपूजन ह. भ. प. श्रीरामजी महाराज चिखलीकर यांच्या शुभहस्ते पार पडले. उद्घाटनपर भाषणात महाराजांनी सांगितले की, बायो सीएनजी प्रकल्प हा केवळ उद्योग नसून शेतकरी, पर्यावरण आणि पुढील पिढीचा विचार करणारा उपक्रम आहे. अशा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल, ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होईल आणि स्वच्छ ऊर्जेचा प्रसार होईल. सर्वांनी या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास भारत निंबाजी राठोड (सेवानिवृत्त डी.एफ.ओ.), श्री तन्मय पावले (संचालक, इकोधारा कंपनी, पुणे), श्री धरमसिंग राठोड (सेवानिवृत्त दारूबंदी अधिकारी), अरुणभाऊ उपलेंचवार (गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर), मा. समाधान जाधव (उपाध्यक्ष, जिल्हा परिषद नांदेड), डी. एफ. राठोड (सेवानिवृत्त प्राध्यापक, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी), श्री दत्तराव मोहिते (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, माहूर), संजय विठ्ठलसिंग राठोड (माजी समाज कल्याण सभापती, जि. प. नांदेड) आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री तन्मय पावले यांनी आपल्या भाषणात बायो सीएनजी प्रकल्पाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, शेतीतील अवशेष व जैविक कचऱ्यापासून बायो सीएनजी निर्मितीमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होतो. तसेच पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीला चालना मिळते. हा प्रकल्प शेतकरी आणि उद्योग यांच्यातील दुवा ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुरेशभाऊ मुक्कावार (संचालक) यांनी केले. भूमिपूजन विधी विनोदभाऊ निंबाजी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी श्री विजयराव चव्हाण (माजी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी) व अजय विठ्ठलसिंग राठोड (उद्योग अधिकारी) यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास संचालक मंडळातील ज्योती कुणाल राठोड, सपना अजय राठोड, राजेंद्र शंकरराव चाडावार, व्यंकटेश भूमन्ना कंचालावार, विशाल अरुण उपलेंचवार, श्रीकांत रामेश्वर तायवाडे, विजय बद्दू चव्हाण यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता विजय बद्दू चव्हाण (रा. वानोळा) यांनी आभार प्रदर्शन करून केली.

No comments:

Post a Comment

फॉलोअर