गोंडवडसा | (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
आज दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी गोंडवडसा शेत सर्वे नंबर २३५ येथे रेणुका देवी बायो सीएनजी प्रा. लि. तर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने तसेच प्रस्तावित सीएनजी कारखान्याच्या उभारणीसाठी भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर भूमिपूजन ह. भ. प. श्रीरामजी महाराज चिखलीकर यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमास भारत लिंबाजी राठोड (सेवानिवृत्त डी.एफ.ओ.), श्री तन्मय पावले (संचालक, इकोधारा कंपनी, पुणे), श्री धरमसिंग राठोड (सेवानिवृत्त दारूबंदी अधिकारी), अरुणभाऊ उपलेंचवार (गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर), मा. समाधान जाधव (उपाध्यक्ष, जिल्हा परिषद नांदेड), डी. एफ. राठोड (सेवानिवृत्त प्राध्यापक, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी), श्री दत्तराव मोहिते (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, माहूर), संजय विठ्ठलसिंग राठोड (माजी समाज कल्याण सभापती, जि. प. नांदेड) आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुरेशभाऊ मुक्कावार (संचालक) यांनी केले. यावेळी शेतकरी मार्गदर्शन श्री कुणाल विनोद राठोड यांनी करत बायो सीएनजी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे, रोजगारनिर्मिती व पर्यावरणपूरक ऊर्जेचे महत्त्व विशद केले.
भूमिपूजन विधी विनोदभाऊ निंबाजी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी श्री विजयराव चव्हाण (माजी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी), अजय विठ्ठलसिंग राठोड (उद्योग अधिकारी) यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास संचालक मंडळातील ज्योती कुणाल राठोड, सपना अजय राठोड, राजेंद्र शंकरराव चक्कावर, व्यंकटेश भूपन्ना कचलीवार, विशाल अरुण उपलेंचवार, विजय बद्दू चव्हाण यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता विजय बद्दू चव्हाण (रा. वानोळा) यांनी उपस्थितांचे आभार मानून केली.
No comments:
Post a Comment