Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Saturday, February 7, 2026

धावंडा लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कामाला त्वरित सुरुवात करण्याची मागणीपोहरादेवी येथे माजी आमदार अनंतकुमार पाटील यांची जलसंधारण मंत्र्यांशी चर्चा

पोहरादेवी (ता. मानोरा)( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
आज दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील नगारा भवनात महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. संजयभाऊ राठोड यांची माजी आमदार श्री. अनंतकुमार पाटील (पोहरादेवी) यांनी भेट घेतली. यावेळी प्रस्तावित धावंडा लघु पाटबंधारे प्रकल्प, ता. मानोरा, जि. वाशिम या प्रकल्पाच्या बांधकामास त्वरित सुरुवात करावी, या मागणीसंदर्भात सविस्तर चर्चा करून मंत्री महोदयांना लेखी निवेदन सादर करण्यात आले.
या संदर्भात दि. ०२/०२/२०२६ रोजी मा. कार्यकारी अभियंता, मृद व जलसंधारण विभाग, वाशिम यांना देण्यात आलेल्या पत्राचा उल्लेख करून प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. धावंडा लघु पाटबंधारे प्रकल्प हा तीर्थक्षेत्र पोहरादेवीपासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर प्रस्तावित असून, पोहरादेवी हे वाशिम जिल्ह्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. वाशिम जिल्हा व विशेषतः मानोरा तालुका कायमस्वरूपी सिंचन सुविधेअभावी आर्थिकदृष्ट्या मागास राहिला असून, शेती व्यवसायाला मोठा फटका बसत आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले की, पोहरादेवी येथे वर्षातून सहा वेळा मोठ्या यात्रा भरतात, ज्यामध्ये संपूर्ण भारतातून बंजारा समाजाचे सुमारे १० ते १५ लाख भाविक दर्शनासाठी येतात. सदर लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण झाल्यास पिण्याच्या पाण्याची सोय, यात्रेकरूंकरिता आवश्यक सुविधा तसेच शेतकरी वर्गास सिंचनाचा मोठा लाभ होणार आहे.
त्यामुळे धावंडा लघु पाटबंधारे प्रकल्पाचे बांधकाम तातडीने सुरू करण्यात यावे, अशी जोरदार मागणी माजी आमदार श्री. अनंतकुमार पाटील यांनी केली.
यावेळी श्री. बाबुसिंग नाईक, श्री. रत्न पवार, श्री. विठ्ठल शिंदे सर, श्री. मुकुंद आडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

फॉलोअर