Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Monday, February 9, 2026

ध्रुव बाळ व भरत राजाच्या कथेतून जीवनमूल्यांचा संदेश – ह. भ. प. श्रीराम महाराज चिखलीकर

मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क)तालुक्यातील ग्राम हळदा येथे संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी हरिभक्त परायण ह. भ. प. श्रीराम महाराज चिखलीकर यांनी आपल्या प्रभावी प्रवचनातून भक्तांना भक्ती, त्याग आणि वैराग्याचा मार्ग दाखविला.
दुसऱ्या दिवसाच्या कथाकथनात महाराजांनी प्रथम ध्रुव बाळाच्या कथेवर प्रकाश टाकत, अल्पवयातही अढळ श्रद्धा, तपश्चर्या आणि निश्चयबळाच्या जोरावर ईश्वरप्राप्ती कशी साधता येते, हे समजावून सांगितले. ध्रुव बाळाच्या जीवनातून भक्तीची ताकद आणि ध्येयप्राप्तीसाठीची चिकाटी त्यांनी भाविकांसमोर प्रभावीपणे मांडली.
यानंतर महाराजांनी भरत राजाची कथा सांगताना सांसारिक वैभव असूनही वैराग्याचा स्वीकार करून आत्मकल्याणाचा मार्ग कसा निवडावा, याचे सखोल विवेचन केले. भरत राजाच्या जीवनातील प्रसंग, त्यागभावना आणि आत्मचिंतन यांचे अनेक दृष्टांत देत महाराजांनी श्रोत्यांना जीवनातील योग्य मूल्यांची जाणीव करून दिली.
महाराजांच्या ओघवत्या शैलीतील कथाकथनामुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. भरत राजाची कथा पूर्ण करून आजच्या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. श्रीमद् भागवत कथेच्या पुढील दिवसांविषयी भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून मोठ्या संख्येने भक्तांची उपस्थिती पाहायला मिळत आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर