मानोरा : (प्राप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क)
नववर्ष व गुडीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मानोरा तालुक्यात सहकार आणि राजकीय क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दि. अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., अकोला यांच्या संचालक पदाच्या निवडणुकीत मानोरा तालुका सेवा सहकारी संस्था सलग्न संस्था मतदारसंघातून मा. अरविंद पाटील इंगोले (माजी अध्यक्ष, जि.प. वाशिम) यांची अविरोध निवड झाली.
ही निवडणूक बऱ्याच कालावधीनंतर बिनविरोध घडून आणण्यात खा. संजयभाऊ देशमुख आणि मा. अनिलभाऊ राठोड यांनी पुढाकार घेत महत्त्वाची भूमिका बजावली. त्याबद्दल मानोरा तालुक्याच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन दोन्ही नेत्यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर खा. संजयभाऊ देशमुख आणि मा. अनिलभाऊ राठोड यांनी नवनिर्वाचित संचालक मा. अरविंद पाटील इंगोले यांचा सत्कार केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी इंगोले यांच्या निवडीबद्दल अभिनंदन व्यक्त करत त्यांच्या माध्यमातून मानोरा तालुक्याला सहकार क्षेत्रात अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी विजय अनंतकुमार पाटील (माजी सदस्य, पं.स. मानोरा), उमेश पाटील ठाकरे (संचालक, अ.जि. मध्य. सह. बँक अकोला तथा माजी सदस्य, जि.प. वाशिम), प्रा. राजेंद्र पाटील म्हातारमारे (नगरसेवक, नगरपंचायत मानोरा), गणेशभाऊ जामदार, महेश पाटील राऊत (माजी उपसभापती, पं.स. मानोरा), गजाननभाऊ भवाने (माजी सदस्य, पं.स. मानोरा), श्यामभाऊ राठोड (वाई गौळ), गजानन राऊत (माजी संचालक, खरेदी विक्री संघ मानोरा), नरेंद्र पाटील राऊत आणि भाविक चतुरकार (कोंडोली) यांची उपस्थिती होती.
गुडीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या अविरोध निवडीमुळे मानोरा तालुक्यात समाधानाचे वातावरण असून, सहकार क्षेत्रात नव्या समन्वयाची नांदी मानली जात आहे.
No comments:
Post a Comment