मंगरुळपीर( हरीश चव्हाण)
तालुक्यातील मौजे गोलवाडी येथे संत सेवालाल महाराज संस्थानच्या कळस स्थापनेनिमित्त बंजारा धर्मगुरू महंत नेहरू महाराज यांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला. हा कार्यक्रम माँ जगदंबा सार्वजनिक वाचनालय, गोलवाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
संत सेवालाल महाराजांच्या कळस स्थापनेचा विधी तपस्वी नेहरू महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमात माँ जगदंबा सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष हरिश्चंद्र वसराम चव्हाण व सचिव रुक्मिणी हरिश्चंद्र चव्हाण यांच्या हस्ते महंत नेहरू महाराज यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती शिंदे, तांड्यांचे नायक निरंजन नाईक, वसंत चव्हाण, उत्तम चव्हाण, विक्रम राठोड, राजू नाईक, सुभाष चव्हाण, रमेश चव्हाण, लोकचंद चव्हाण, माजी सरपंच दत्ता शिंदे, गजानन राठोड, तांड्याचे कारभारी विष्णू नाईक, उदल चव्हाण, सुदाम जाधव यांच्यासह गावातील व तांड्यातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचा समारोप भक्तिमय वातावरणात झाला.
No comments:
Post a Comment