उमरी बु. : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क ). तीर्थक्षेत्र उमरी बु. येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी जनसेवेच्या भावनेतून पानपोई सुरू करण्यात आली आहे. ही पानपोई स्व. पांडुजी नाईक, स्व. तोतिबाई पांडुजी नाईक, स्व. जे. पी. जाधव सर, स्व. बेबीताई पांडुजी जाधव तसेच स्व. अतुल रमेश जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आली आहे.
स्व. पांडुजी जाधव (लाखावत) परिवार, उमरी गड यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला असून, तीर्थक्षेत्रावर येणाऱ्या भाविकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश यामागे आहे. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम विशेष उपयुक्त ठरणार आहे.
या उपक्रमाचे प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. मंडळ अधिकारी संदीप आडे यांनी प्रशांत जाधव व संपूर्ण जाधव परिवाराचे अभिनंदन करून त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
या पानपोईमुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार असून, परिसरात या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment