वाशिम / शेंदुरजना (अ) (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस.)
वाशिम तालुक्यातील अडोळी येथे शेतकऱ्यांनी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सुरू केलेले ङ्खगाव विक्रीङ्ग ठिय्या आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असून, या आंदोलनाला जिल्हाभरातून मोठा पाठींबा मिळत आहे. दरम्यान, खासदार संजय देशमुख यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या मागण्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.
२ एप्रिलपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सुरू असलेल्या या आंदोलनात शेतकरी ङ्खसरसकट कर्जमाफी द्या, पीकविमा लागू करा, सातबारा कोरा करा तसेच एमआयडीसी प्रकल्प सुरू कराङ्ग अशा प्रमुख मागण्या करीत आहेत. विशेष म्हणजे, शासनाने कर्जमाफी जाहीर करूनही सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नसल्याचा आरोप करत, ङ्खगाव विकून कर्जमुक्तीङ्ग अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
आंदोलनाची दखल घेत महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी विभागाचे कर्मचारी तसेच तहसीलदार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली. मात्र, या चर्चेत शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही.
दि. ४ एप्रिल रोजी खासदार संजय देशमुख यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ङ्खशेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून सध्याची कर्जमाफी योजना अपुरी आहे. अनेक शेतकरी त्यापासून वंचित राहणार आहेत.ङ्ग तसेच त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या कृषीमंत्री व पालकमंत्री दत्ताभाऊ भरणे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वतः मांडणार असल्याचे स्पष्ट केले. ङ्खमी तुमच्या सोबत आहे,ङ्ग असे आश्वासनही त्यांनी दिले.
या भेटीदरम्यान शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) गटाचे डॉ. सिद्धार्थ देवळे, जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, वाकद येथील शेतकऱ्यांनी अडोळी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला असून, राजीव गांधी पंचायतराज अभियानचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन लेखी समर्थन दिले आहे. नागठाणा येथील शेतकऱ्यांनी वाशीम-रिसोड मार्गावर टायर जाळून शासनाचा निषेध केला, तर मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी येथील शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला.
एकूणच, अडोळी येथील ङ्खगाव विक्रीङ्ग आंदोलनाला जिल्ह्यातील विविध गावांमधून वाढता प्रतिसाद मिळत असून, शासनाविरोधातील नाराजी तीव्र होत चालली आहे. येत्या काळात हे आंदोलन अधिक उग्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
No comments:
Post a Comment