Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Sunday, April 5, 2026

बबनराव सवयराम राठोड यांची राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

वाशिम  : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या माध्यमातून गोर-बंजारा समाजाचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी बबनराव सवयराम राठोड (सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी, वाशिम) यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गोरनायक उमेश एस. राठोड यांनी अधिकृत नियुक्तीपत्र देऊन ही घोषणा केली.
या नियुक्तीस राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्वाचे मार्गदर्शन लाभले असून, राष्ट्रीय समन्वयक किसनभाऊ राठोड, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मोहन चव्हाण, राष्ट्रीय सल्लागार विलासभाऊ राठोड तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष पंडितभाऊ राठोड यांच्या संमतीने ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
बबनराव राठोड यांनी दीर्घकाळ सामाजिक क्षेत्रात कार्य करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या संघटन कौशल्याच्या बळावर ते समाजातील तरुणांना संघटित करून संघटनेची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष उमेश राठोड यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या निवडीचे राज्यभरातून स्वागत होत असून विविध स्तरांतील मान्यवर व कार्यकर्त्यांकडून बबनराव राठोड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर