चिखली (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी चिखली येथे झेंडा रोहण व विविध कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
या प्रसंगी सरपंच आशिष पाटील, अविनाश राठोड, पोलिस पाटील श्यामराव राठोड, अनिल जाधव, उग्रेश्वर राठोड, महादेव पवार, गोपाल राठोड, शेषराव राऊत, सोनू इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच शेकडो ग्रामस्थांनी कार्यक्रमास उपस्थित राहून अभिवादन केले.
कार्यक्रमाचे आयोजन शेषराव राऊत, अरुण राऊत, लक्ष्मण इंगोले, प्रवीण राऊत, राजेश शाळीग्राम राऊत, मणिराम तायडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. यामध्ये महिला मंडळींचाही उत्स्फूर्त सहभाग लाभला.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला अभिवादन केले.
No comments:
Post a Comment