Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Saturday, April 25, 2026

दूध भेसळ रोखण्यासाठी ‘आयआयटी’च्या सहकार्याने ‘एआय’ आधारित यंत्रणा तयार करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



मुंबई,  : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
राज्यात दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने टेस्ट स्ट्रीप तयार केली आहे. मात्र, दुधातील भेसळ रोखण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड व आयआयटी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून यंत्रणा तयार करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

राष्ट्रीय डेयरी विकास बोर्डचे अध्यक्ष मीनेश शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या कामकाजाची माहिती दिली.या बैठकीस मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, दुग्धविकास विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर, नॅशनल हेवी इंजिनियरिंग कॉपरेटिव्ह लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संतोष थॉमस, एनडीडीबीचे क्षेत्रीय प्रमुख व्ही. श्रीनिवास, विदर्भ मराठवाडा डेयरी विकास प्रकल्प संचालक डॉ. संजय गोरानी, मदर डेअरीचे उप महाव्यवस्थापक गौरव गुप्ता उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात सध्या ४० टक्के दूध संघटित क्षेत्रातून प्रक्रिया केले जाते. तर उर्वरित दूध असंघटीत क्षेत्रातून येत असल्याने भेसळीचे प्रमाण मोठया प्रमाणावर आढळते. त्यामुळे अधिकाधिक उत्पादक आणि गावांना संघटित डेअरी व्यवस्थेत आणण्यावर शासनाचा भर आहे. देशभरात ७५ हजार नवीन गावे सहकारी व्यवस्थेत जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळण्यासोबतच भेसळ रोखण्यास मदत होणार आहे. दूध भेसळ रोखण्यासाठी विशेष टेस्ट स्ट्रिप विकसित करण्यात आली असून ही स्ट्रिप यूरिया तसेच इतर भेसळ घटक ओळखण्यास सक्षम असून पुढील सहा महिन्यांत ती पूर्णपणे कार्यान्वित होईल. असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मीनेश शाह म्हणाले की, राज्य शासनाने केलेल्या सहकार्यामुळे महानंदच्या पुनरुज्जीवनाला गती मिळाली असून सुमारे ७८ टक्के काम पूर्ण झाले आहे. ३ लाख लिटर क्षमतेचा नवीन ग्रीनफिल्ड डेअरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. महानंदा परिसरात सिग्नेचर पार्लर आणि अत्याधुनिक इमारत उभारण्यात आल्या आहेत. आरे आणि महानंदा यांच्या ब्रँडचे रिलाँचिंग लवकरच करण्यात येईल. मुंबईतील आरे कॉलनीमध्ये कंप्रेस्ड बायोगॅस प्रकल्प तसेच उदगीर येथे महानंदचे नवीन डेअरी प्लांट उभारण्यात येणार आहे. नागपूरमधील बुटीबोरी येथे अत्याधुनिक डेअरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्या वतीने विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यात दुधसंकलन वाढविण्यात येत आहे. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या चाचणीसाठी केंद्र शासनाच्या एनपीडीडी योजनेअतंर्गत महानंद डेअरीमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात आली असल्याचे मीनेश शाह यांनी सांगितले.
0000

No comments:

Post a Comment

फॉलोअर