Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Wednesday, April 22, 2026

हरसूल येथे 24 एप्रिल रोजी सत्यपाल महाराजांच्या कीर्तनाचे आयोजनभीम जयंती ते ग्राम जयंती निमित्ताने आयोजन


दिग्रस : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्ष प्रारंभ तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भीम जयंती आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती अर्थात ग्राम जयंतीच्या पर्वावर हरसूल येथे समाज प्रबोधन व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सप्तखंजेरी वादक प्रसिद्ध कीर्तनकार सत्यपाल महाराज यांच्या प्रभावी कीर्तनाचा हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता जिल्हा परिषद मराठी शाळा, हरसूल येथील पटांगणात होणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून विशेषतः विदर्भात आपल्या खंजेरीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे सत्यपाल महाराज हे लोकमान्य कीर्तनकार आहेत. त्यांच्या कीर्तनातून अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा यांवर मार्मिक प्रहार केला जातो. तसेच समाजात वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेविरोधात जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही ते करतात. त्यांच्या वऱ्हाडी बोलीतील सादरीकरणामुळे श्रोत्यांना प्रबोधनाची अनोखी मेजवानी अनुभवायला मिळते.

या कार्यक्रमास तहसीलदार मयूर राऊत, ठाणेदार तेजस सारडा (IPS), सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मानकर, एबीपी माझाचे प्रतिनिधी उमेश अलोने आणि राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित गावचे सुपुत्र आमीन चौहान यांची उपस्थिती अपेक्षित असल्याची माहिती मुख्य आयोजक गजानन सोनुने यांनी दिली आहे.

गुरुदेव सेवा भजनी मंडळ, वारकरी मंडळ, बिरसा मुंडा उत्सव समिती, संभाजी ब्रिगेड, नवयुवक भीम टायगर सेना तसेच हरसूल येथील शेतकरी, शेतमजूर व समस्त गावकऱ्यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, हरसूल व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर