Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Saturday, April 25, 2026

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडू घडविण्यासाठी क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश प्रक्रिया सुरू


वाशिम, दि.२५ एप्रिल (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)  अधिकाधिक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे यांच्या अंतर्गत राज्यातील विविध क्रीडा प्रबोधिनीत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
राज्यात कार्यरत ०९ क्रीडा प्रबोधिनीत सरळ प्रवेश (५० टक्के) व कौशल्य चाचणी (५० टक्के) या “खेलो इंडिया” निपुणता केंद्र प्रक्रियेअंतर्गत निवासी व अनिवासी खेळाडूंना प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी अमरावती विभागातील खेळाडूंच्या निवडीकरिता विभागीय स्तरावर चाचण्यांचे आयोजन करण्यात आले असून, वाशिम जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य प्राप्त खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
विभागीय चाचण्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
हॅण्डबॉल, जलतरण, सायकलिंग, हॉकी, बॅडमिंटन, फुटबॉल, ज्युदो व अॅथलेटिक्स या खेळांच्या चाचण्या दि. २८ व २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता अमरावती येथील विविध क्रीडांगणांवर होणार आहेत. जिम्नॅस्टिक्स या खेळाची चाचणी दि. २९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे.
पात्रता निकष :
राज्यस्तरावर पदकप्राप्त अथवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केलेले १९ वर्षांखालील खेळाडू सरळ प्रवेशासाठी पात्र असतील. तसेच राज्यस्तरावर सहभागी १९ वर्षांखालील खेळाडूंना कौशल्य चाचणीद्वारे गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाईल. काही खेळांसाठी “खेलो इंडिया” निपुणता केंद्रांतर्गत २० वर्षांखालील खेळाडूंनाही संधी उपलब्ध आहे.
वैद्यकीय तपासणी अनिवार्य :
निवड झालेल्या खेळाडूंनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असून, त्यानंतरच अंतिम प्रवेश निश्चित केला जाईल.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र खेळाडूंनी क्रीडा प्रबोधिनी विभागीय चाचणीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम येथे नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किशोर बोंडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर