मानोरा - (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
तालुक्यातील तीर्थक्षेत्र वाई गौळ वरून मंगरूळनाथ येथे जाण्यासाठी थांबलेल्या प्रवाशाला मंगरूळनाथ आगाराच्या राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांनी बसमध्ये न घेता आपली गाडी पुढे दामटवीत प्रवासाच्या अधिकाराचे उल्लंघन केल्याने अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्रातच नव्हे तर अख्या देशांमध्ये आपल्या सेवेचा ठसा उमटविणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेला काही हेकेखोर मानसिकतेच्या व एसटी बसला स्वतःची खाजगी मालमत्ता समजणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे तिकीट देऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा प्रत्यय आज वाई गौळ येथे काही प्रवाशांना आला.
सकाळी साडेनऊ वाजता मंगरूळनाथ येथे जाण्यासाठी उभे असलेले प्रवासी जगदीश जाधव यांनी एम एच ४० वाय ५१३३ बसला हात देऊन स्वतः व त्यांच्या आईंना बसमध्ये चढू देण्याची विनंती केली असता सदरील काही असणे रिक्त असलेल्या बसच्या एस एस पिंपळे नामक वाहकाने त्यांच्याकडे बघूनही मग्रुरीने त्यांची विनंती धुडकावून गाडी न थांबविता घंटी मारून गाडी पुढे मार्गस्थ केली.
सुरक्षित प्रवासासाठी गर्दीच्या हंगामाच्या काळात वाढीव तिकीट दर मोजून एसटी बसणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अशा मनमानी पद्धतीने बसचे संचालन करणारे व प्रवाशांच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या संबंधित एस एस पिंपळे नावाच्या बस वाहकाने सौजन्याने सेवा न केल्याची व प्रवाशांच्या अधिकारावर अतिक्रमण केल्याची तक्रार संबधित प्रवाशाने विभाग नियंत्रक अकोला यांच्याकडे करून कारवाईची मागणी केली आहे.
चौकट:---
एस एस पिंपळे सारख्या काही कर्मचाऱ्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला बदनामीला सामोरे जावे लागत असून या कर्मचाऱ्यांच्या बेजाबाबदारपणामुळे प्रवाशांना आपले जीव धोक्यात घालून खाजगी वाहनाने प्रवास करण्याची पाळी आली आहे.
No comments:
Post a Comment