मानोरा :( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
तालुक्यातील भुली येथे संत सेवालाल महाराज कर्मचारी बहुउद्देशीय संस्थेतर्फे यवतमाळचे नायक तथा राष्ट्रीय बंजारा परिषदेचे कार्याध्यक्ष अवचितराव जाधव यांचे सुपुत्र शुभम अवचितराव जाधव यांची नागपूर कारागृह पोलीस विभागात निवड झाल्याबद्दल अभिनंदन व पालक सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी महंत श्री जितेंद्र महाराज पोहरादेवी यांच्या हस्ते शुभम जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या आजी-आजोबा, आई-वडील यांचाही शाल-श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शुभम जाधव, त्यांचे कुटुंबीय, अभ्यासिकेतील विद्यार्थी व गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर संत सेवालाल महाराज देवस्थानाच्या सभामंडपात मुख्य कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत सेवालाल महाराज देवस्थानचे अध्यक्ष व्ही. आर. चव्हाण (माजी मुख्याध्यापक) होते. प्रमुख अतिथी म्हणून महंत श्री जितेंद्र महाराज पोहरादेवी, दिलीप जानुसिंग पवार (अडतदार, शिवाजी चौक दिग्रस) तसेच रुपेश मनोहर राठोड (मुंबई) उपस्थित होते.
यावेळी हरिकिसन राठोड (माजी पोलीस), बाबुसिंग महाराज (ग्रामपंचायत सदस्य), अरविंद चव्हाण (माजी सरपंच), रमेश राठोड (उपसरपंच), अरुण डाहाके, रामचंद्र राठोड, उत्तम चव्हाण, सखाराम वारे, बाबाराव जाधव, गणेश राठोड, मंगल चव्हाण, फुलसिंग महाराज, राजेश राठोड, सुभाष राठोड, गोपाल राठोड, जीवन चव्हाण यांच्यासह अभ्यासिकेतील विद्यार्थी राधेश्याम राठोड, देवेश भगत, गोपाल चव्हाण, महेश चव्हाण, योगेश राठोड, निलेश जाधव तसेच महिला भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“परिसरातील नवतरुणांनी मेहनत, चिकाटी व सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर शुभमप्रमाणे यश संपादन करावे,” असे आवाहन संस्थेचे रामधन राठोड (BSF) यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जयकुमार चव्हाण यांनी केले.
संत सेवालाल महाराज कर्मचारी बहुउद्देशीय संस्थेच्या या प्रेरणादायी उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment