Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Sunday, June 21, 2026

पद्मश्री रामसिंगजी भानावत हे क्रांतिकारीच होते

नागपूर (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
        या देशाचा सांस्कृतिक इतिहास हा दोन परस्परविरोधी मूल्यांचा इतिहास आहे. क्रांती आणि प्रतिक्रांती, परिवर्तनवादी आणि जैसे थे वादी, पुरोगामी आणि प्रतिगामी अशा परस्परविरोधी मूल्यसंघर्षात रामसिंगजी भानावती मानवी प्रतिष्ठा ठाशीव करणाऱ्या क्रांतिकारी मूल्यांच्या बाजूने ठामपणे उभे होते. रामसिंगजी भानावत, महानायक वसंतराव नाईक, संत सेवालाल महाराज, जेतालाल महाराज, लाखा बंजारा हे सर्वच वंदनीय अस्मिता क्रांतिकारीच होत्या. त्यामुळे त्यांच्या काळात बंजारा समाजाला प्रतिक्रांतीचे गालबोट लागले नाही.
        परंतु आजचे वास्तव फार वेगळे आहे. आज या समाजात प्रतिक्रांतीचा फैलाव होतो आहे. छोट्यामोठ्या स्वार्थासाठी लोक प्रतिक्रांतीवाद्यांच्या छावण्यांमध्ये शिरत आहेत. त्यामुळे आजच्या मूल्यद्रोही वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर रामसिंगजी यांच्या व्यक्तिमत्त्वातील क्रांतीकारकता समजावून घेण्याची गरज आहे. त्याशिवाय बंजारा समाजात होत असलेल्या प्रतिक्रांतीच्या विचारांना लगाम लावता येणार नाही असे रोखठोक प्रतिपादन अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा प्रसिद्ध परिवर्तनवादी साहित्यिक प्राचार्य डॉ. प्रकाश राठोड यांनी अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या वतीने आयोजित पद्मश्री रामसिंगजी भानावत यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून व्यक्त केले. सदर कार्यक्रम हा आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. 
       कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सेवाभूमी साप्ताहिकाचे संपादक शंकर आडे यांनी मी रामसिंगजी भानावत यांच्यासोबत भारतभर भ्रमण केले असून भानावत साहेब यांचे विमुक्त भटक्या व वंचित समाजाविषयीची तळमळ मी जवळून पाहिलेली आहे. आपल्या भूमिकेवर आपल्या मूल्यावर अढळ निष्ठा असलेले रामसिंग भानावत हे बंजारा समाजातील एकमेवाद्वितीय महापुरुष आहे. समाजातील अंधश्रद्धा विषमता जाती-जातीतील आणि पोट जातीतील भेदाभेद दूर करून विश्वातील बंजारा समाज एका छत्राखाली एकत्र यावा यासाठी रामसिंगजी भानावत यांनी भारतच नव्हे तर विश्व भ्रमण केले असे मत मांडले.
      कार्यक्रमाचे दुसरे वक्ते पोरियातारा टीचर अँड प्रोफेसर असोसिएशनचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष प्रा. राजेंद्र जाधव रायगड यांनी रामसिंग भानावत हे भारतातील भटक्या विमुक्त आणि वंचित समाजाचे एकमेव नेते होते ज्यांना नेहरूं,पटेल, म. गांधी अशा महान नेत्यांना भेटण्यासाठी सुद्धा वेळ घ्यावा लागत नसेल हे विविध प्रसंगावरून श्रोत्यांच्या समोर मांडले. तत्कालीन काळातील सर्वच नेते रामसिंग जी भानावत यांना निरपेक्ष समाजसेवक या दृष्टीनेच बघत होते यावरून रामसिंग जी भानावत हे बंजारा समाजातील किती वजनदार व्यक्तिमत्व होते याची जाणीव आल्या शिवाय राहत नाही असे मत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू रत्ने, प्रास्ताविक नामा बंजारा यांनी तर आभार मुख्याध्यापक पंतूसिंग जाधव आर्वी यांनी केले.

No comments:

Post a Comment

फॉलोअर