अकोला : ( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
जिल्ह्यातील सर्व अंशतः बंधु आणि भगिनींना कळविण्यात येते की,अंशतः अनुदानित शाळांतील टप्पा वाढ व प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक २२ जून २०२६ पासून मुंबई आझाद मैदान येथे समन्वय संघाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या अनुषंगाने पुढील दिशा, नियोजन व अकोला जिल्ह्यातील सहभागाबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन दिनांक -19/06/2026 रोजी बि आर हायस्कूल अकोला येथे करण्यात आले होते. या बैठकीत शेकडो प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अंशतः अनुदानित शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. यावेळी अनेक मुद्द्यावर सखोल चर्चा करण्यात आली. त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना समान टप्पा व टप्पा वाढ ते पेन्शन व वैद्यकीय योजना इत्यादी गोष्टीवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली त्याचबरोबर श्री.विकास पागृत, प्रा.संतोष वाघ, श्री.बाळकृष्ण गावंडे, असीमोद्दीन सर, प्रा.विजय थोटांगे सर, प्रा.तौफिक खान प्रा.श्रीधर भदे यांची मनोगत झाली यावेळी शिक्षक समन्वयक उपेंद्र बाबाराव पाटील यांनी आपले मनोगतातून मुंबई येथे होऊ घातलेल्या पावसाळी अधिवेशनात आपला प्रश्न कसा मार्गी लावायचा याबाबत मार्गदर्शन केले. आणि सर्व अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. शासन जोपर्यंत आपले काम करत नाही म्हणजे प्रचलीत धोरणानुसार टप्पा वाढ करत नाही तोपर्यंत आजाद मैदान मुंबई येथून हलायचे नाही अशा प्रकारे सर्वानुमते चंग बांधण्यात आला. यावेळी देवेंद्र जपसरे ,प्रा.प्रवीण धाडसे ,आनंदा डोंगरे, सोहेल खान ,विलास घोगरे , योगेश सुसनकर, जमिला फातिमा ,जावेद खान, अब्दुल अहमद ,गणेश गिऱ्हे ,श्रीकांत पाटील ,कु. कल्पना हुरपडे, कु. पी पी पागृत,प्रा.डी एस नवघरे, एस एच बालदे उपस्थित होते
तरी अंशतः अनुदानित क्षेत्रातील सर्व संघटनांचे राज्य पदाधिकारी, विभाग पदाधिकारी जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी या आझाद मैदान येथे आवर्जून उपस्थित राहावे. तसेच सर्व अंशतः अनुदानित प्राथमिक,मध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि भगिनींनी बहुसंख्येने मुंबई आझाद मैदान येथे
दिनांक 22 जून पासून आपले काम होईपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत विदर्भातील सर्व अंशतः अनुदानित शिक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे शिक्षक समन्वय संघाच्या वतीने प्रा.संतोष वाघ, श्री.उपेंद्र बाबाराव पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment