Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Wednesday, June 24, 2026

ग्रामस्थांचे तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन खापरदरी वासीयांचे पाण्यासाठी हाल


मानोरा :( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) 
तालुक्यातील खापरदरी गावात केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेली पाणीपुरवठा नळ योजना गेल्या काही दिवसांपासून बंद पडल्याने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे. ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी खापरदरी येथील रहिवासी जगदीश शामराव राठोड यांनी २३ जून रोजी मानोरा तहसीलदारांमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले.
गावातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी पोहोचविण्याच्या उद्देशाने जल जीवन मिशन अंतर्गत नळ योजनेचे काम सुरू करण्यात आले होते. सुरुवातीला कामाला गती मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र काही महिन्यांपासून योजनेचे काम संथ गतीने सुरू होते आणि आता ते पूर्णपणे ठप्प झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विशेषतः उन्हाळ्यात निर्माण झालेली पाणीटंचाई अद्याप पूर्णपणे दूर झालेली नसताना नळ योजना बंद पडल्याने नागरिकांच्या अडचणीत अधिक भर पडली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मानोरा तहसील कार्यालयात निवेदनाची रीतसर पोहोच घेण्यात आली असून ते पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. आता प्रशासन या प्रश्नाची कितपत गांभीर्याने दखल घेते आणि खापरदरी गावातील रखडलेली जल जीवन मिशन योजना पुन्हा सुरू होऊन ग्रामस्थांना दिलासा मिळतो का, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.
म्हणण्यानुसार, जल जीवन मिशनसारख्या महत्त्वाच्या योजनेचे काम अर्धवट अवस्थेत सोडल्यामुळे शासनाच्या उद्दिष्टांनाच हरताळ फासला जात आहे. गावकऱ्यांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित असल्याने या विषयाकडे दुर्लक्ष करणे योग्य नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काम बंद पडण्यामागील कारणांची चौकशी करून रखडलेले काम युद्धपातळीवर पुन्हा सुरू करावे तसेच झालेल्या विलंबाबाबत संबंधित यंत्रणा व कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर