Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Thursday, July 2, 2026

फसल विमा महिन्याला प्रारंभ; मृग बहार 2026 फळपीक विम्यासाठी 14 जुलै पर्यंत अर्ज शेतकऱ्यांनी मुदती पूर्वी योजनेत सहभागी होण्याचे कृषी विभाग व भारतीय कृषी विमा कंपनीचे आवाहन.

शेंदुरजना (अ) / वाशिम : (दिग्रस साप्ताहिक एक्सप्रेस)

वाशिम जिल्ह्यात 1 जुलै ते 31 जुलै 2026 या कालावधीत भारतीय कृषी विमा कंपनी (AIC) तर्फे 'फसल विमा महिना' साजरा करण्यात येत असून, पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना (मृग बहार 2026) मध्ये सहभागी होण्यासाठी 14 जुलै 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कृषी विभाग तसेच भारतीय कृषी विमा कंपनीचे *जिल्हा प्रतिनिधी नवनाथ मगरे आणि मानोरा तालुका विमा प्रतिनिधी चंद्रशेखर राठोड* यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यात द्राक्ष, संत्रा, मोसंबी, लिंबू, पेरू, चिकू आणि हळद या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यावर्षी हळद या पिकाचाही प्रथमच योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित पिकांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी फळपीक विमा काढून नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या संभाव्य आर्थिक नुकसानीपासून संरक्षण मिळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

फसल विमा महिन्यानिमित्त जिल्हाभर विमा प्रतिनिधी गावोगावी भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. तसेच 'फसल विमा पाठशाळा' आयोजित करून योजनेची पात्रता, नोंदणी प्रक्रिया, संरक्षणाचा लाभ आणि विम्याचे महत्त्व याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे.

टीप : मृग बहार 2026 अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 14 जुलै 2026 पूर्वी अर्ज करावा, असे आवाहन संबंधित यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर