Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Thursday, July 2, 2026

०७ व ०८ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्रातील सर्व अंशतः अनुदानित शाळा बंद. शिक्षक समन्वय संघाचा राज्यव्यापी निर्णय; सहभागी व्हावे : उपेंद्र बाबाराव पाटील यांचे आवाहन


 अनुदानासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी तीव्र आंदोलनाची हाक
मुंबई, दि. २ जुलै : महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक समन्वय संघाने ०७ व ०८ जुलै २०२६ रोजी राज्यातील सर्व अंशतः अनुदानित शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो शाळांमधील अध्यापनाचे कामकाज दोन दिवस ठप्प ठेवून आझाद मैदानावर हजर रहावे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुदानासह विविध मागण्यांबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी असून, अखेर शाळा बंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.
या आंदोलनात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक शाळेने आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवून शासनापर्यंत आपल्या न्याय्य मागण्या पोहोचवाव्यात, असे आवाहन शिक्षक समन्वय संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
संघटनेच्या मते, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी वर्षानुवर्षे प्रामाणिक सेवा बजावली आहे; मात्र त्यांना आर्थिक व प्रशासकीय न्याय मिळालेला नाही. त्यामुळे हा लढा केवळ शिक्षकांचा नसून शिक्षण व्यवस्थेच्या सन्मानासाठी असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घेऊन प्रलंबित प्रश्न निकाली काढावेत, अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही शिक्षक समन्वय संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे राज्य संघटक पुंडलिकराव रहाटे अमरावती विभाग संघटक उपेंद्र बाबाराव पाटील प्रा.संतोष वाघ, प्रशांत कव्हर , रवींद्र तम्मेवार अमरावती विभाग अध्यक्ष सुधाकर वाहूरवाघ,सुरेश शिरसाट , जगदीश गोरे, अमित भाई प्रसाद, भारत जामनिक, किरण चौधरी,आर जी पठाण, विजय देशमुख, भैरव भेंडे, सुनील देशमुख ,विनोद इंगळे, संतोष येरेकर, सुनील डहाके, अजय वाने,अंकुश शेंडोकर , जी एस बोरकर, संदीप देशमुख, सतीश गायधनी, ओम हांडे,काशीराम लांडगे, संतोष गिऱ्हे , अकिल आफताब ,बोंद्रे सर, गुजर सर, लाकडे सर ,संतोष गावंडे ,गोपाल चव्हाण आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर