मानोरा : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजहितासाठी सातत्याने योगदान देणारे संजय चंदूभाऊ भुजाडे यांना ‘महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले.
दैनिक लोक युवा वृत्तपत्राच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत संजय चंदूभाऊ भुजाडे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी शेगाव, जि. बुलढाणा येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सामाजिक कार्याची दखल घेत मिळालेल्या या सन्मानाबद्दल संजय चंदूभाऊ भुजाडे यांचे मानोरा तालुक्यासह परिसरातून अभिनंदन होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
No comments:
Post a Comment