भिवापूर - मांडवा तांडा ( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क)
भिवापूर तालुक्यातील उमरेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांडवा तांडा येथे मंगळवार दिनांक ११ मार्च रोजी उमरेड पोलीस ठाणेदार
मा.श्री धनाजी जळत साहेब व अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे राष्ट्रीय महासचिव तथा बंजारा टीचर अँड प्रोफेसर असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव नामा बंजारा यांच्या प्रमुख उपस्थितीत दारूबंदी या विषयावर सहविचार सभेचे आयोजन करून आजपासूनच तांड्यात दारूबंदी झाली असा ऐतिहसिक निर्णय घेण्यात आला. संत सेवालाल महाराज यांनी पाच पाराद्वारे दिलेली शिकवण व दारूमुळे परिवार व मुलाचे भवितव्य उद्ध्वस्त होऊ नये यासाठी महानायक वसंतराव नाईक यांनी दारूभट्टी विरुद्ध पुकारलेला लढा, व आश्रम शाळेची निर्मिती इत्यादी उदाहरणं देऊन मांडवा निवासी स्त्री पुरुषांना मोलाचे मार्गदर्शन केले. महिला प्रतिनिधी म्हणून सौ. सारिका ताई नूनावत यांनी बालकावर होणाऱ्या संस्काराचा मुद्दा उपस्थित करत आई वडिलांनी आपल्या पाल्याला योग्य वळण लावले पाहिजे असा मोलाचा संदेश दिला. महिला प्रमुख सौ.नवशीबाई चव्हाण यांनी आजपासून तांड्यात दारूनिर्मिती व विक्री खपवून घेणार नाही असे खडे बोल सुनावले. कलाशिक्षक सुरेश राठोड ईश्वर जाधव, फकीरचंद राठोड सह मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी व्यसनापासून होणाऱ्या दुष्परिणाम, शिक्षणाचा महत्त्व समाजाची दशा आणि दिशा या विषयावर मार्गदर्शन केले.
मांडवा या गावात दिनांक २८ फेब्रुवारी रोजी दारू पिऊन मित्राने आपल्याच मित्राचे निर्घृणपणे हत्या केली होती, त्यामुळे दोन्ही कुटुबाचे भवितव्य उद्ध्वस्त झाले, अश्या घटनेची गावात पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या मुलांचे भवितव्य दारुमुळे उद्ध्वस्त होणार नाही यासाठी दारूबंदी सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत दारूबंदीचा ऐतिहसिक निर्णय घेण्यात आला.
बेसुर बिटचे अंमलदार प्रकाश मुरकुटे यांनी सुद्धा मांडवा गावात अवैध दारुबिक्री होणार नाही या गावात दारूबंदीसाठी पुर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी उपस्थित उमरेड नगरीचे नायक फकीरचंद राठोड, कारभारी मुक्तेश्वर राठोड उमेश राठोड, नाना राठोड, ईश्वर जाधव, गणेश राठोड, बालाजी साखरे गुपित विभाग पोलीस स्टेशन उमरेड, प्रकाश मुरकुटे बेसुर क्षेत्राचे बिट जमादार , दोन्ही तांडयाचे नायक कारभारी, चारगावचे वाकडे साहेब, सिल्लेपारचे घरत सर आणि गावातील महिला- पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे आयोजनात हरिदास नूनावत धर्मेंद्र जाधव यांसह संपूर्ण गावकऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. सभेच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मण मालोत, पोलिस पाटील दिलीप राठोड, तंटामुक्ती अध्यक्ष गजेसिंग राठोड, चेलसिंग पवार सह अनेकांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment