Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, March 21, 2025

वीजबिल भरा अन् गैरसोय टाळा;महावितरणचे जाहिर आवाहनसुट्टीच्या दिवसीही सुरू ठेवण्यात आली वीजबिल भरणा केंद्रे


यवतमाळ,दि.२१ मार्च २०२५;( दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
       परिमंडळाअंतर्गत महावितरणला पुढील १० दिवसात १५२ कोटी वसूल करायचे आहे.त्यासाठी महावितरणने मोहिम तीव्र केली असून वसूलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे.त्यामुळे वीज ग्राहकांनी चालू तसेच थकीत वीजबिल भरावे आणि आपली गैरसोय टाळावी असे आवाहन महावितरणने केले आहे.

      चालू आर्थीक वर्षाचे केवळ १० दिवस शिल्लक आहे .प्रत्येक दिवसाला १५ कोटी वसूल करायचे आहे.वसुलीसाठी कर्मचारीच नाही तर मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांच्यासह अधीक्षक अभियंता(अमरावती) दीपक देवहाते,प्रविण दरोली(यवतमाळ),सर्व कार्यकारी अभियंते आपल्या संपूर्ण टिमसह वसूली मोहिमेत सहभागी झाले आहेत.

"सुट्टीच्या दिवशी वीज बिल भरणा केंद्रे सुरू*

    थकबाकीदार ग्राहकांना वीजबिल भरण्याची सोय व्हावी व महावितरणच्या कारवाईमुळे त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सुट्टीच्या दिवशी वीज बिल भरणा केंद्रे सुरू ठेवण्यात आली आहेत. www.mahadiscom.in या संकेतस्थळावर व मोबाईल अॅपद्वारेही घरबसल्या कोठूनही वीज बिल भरता येते. ऑनलाइन वीज बिल भरल्यास वीज बिलामध्ये ०.२५ टक्के आणि पहिल्या सात दिवसांत (Prompt Payment) बिल भरल्यास १ टक्का असे एकूण १.२५ टक्के सूट मिळते. क्रेडिट कार्ड वगळता इतर पर्यायांद्वारे ऑनलाइनद्वारे होणारा वीज बिल भरणा निःशुल्क आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर