Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Saturday, March 22, 2025

दादा कोंडके यांच्या पांडू हवलदार या चित्रपटाला पन्नास वर्षे पूर्ण होत असल्यामुळे“ दादा आणि पांडू हवालदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन*


 *वाशिम दि.२२ मार्च (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)*
 दादा कोंडके यांच्या पांडू हवलदार या चित्रपटाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत यानिमित्त दादा आणि पांडू हवालदार या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभागा मार्फत  दादांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याकरिता वाशिम येथे दि. २४ मार्च  दादा आणि पांडू हवालदार  “ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन केल्याची माहिती सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात आलेली आहे.   दि २४ मार्च  रोजी    सायंकाळी ६.३०  सांस्कृतिक कार्य कार्यक्रमाचे आयोजन  केलेले आहे. 
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून व सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव  विकास खारगे (भा. प्र. से.) यांच्या नियोजनातून दादा कोंडके यांच्यावर आधारित दादा आणि पांडू हवालदार या नाटिकेच्या माध्यमातून उपस्थित रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात येणार आहे... दादांच्या जुन्या नव्या चित्रपटातील गीत आणि संवादांच्या माध्यमातून हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे 
 स्वागत लोन मन्नासिंह चौक, पुसद नाका वाशिम येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले त्यामध्ये  अश्या   नृत्य संगीत आणि संवाद  ही समावेश असणार आहे.
 पांडू हवलदार या चित्रपटात ५० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून राज्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले असून यामध्ये, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेता  प्रमोद शेलार आणि कलावंत आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत.   रसिक प्रेक्षकांना  प्रत्यक्षात सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद अनुभवता येणार आहे.
  हा कार्यक्रम सर्व रसिक प्रेक्षकांकरिता विनामूल्य असून जास्तीत जास्त  रसिक प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद देऊन या 'कलामृताचा आस्वाद घ्यावा' असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनाल,मुंबई चे संचालक  विभीषण चवरे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर