Pages
Saturday, March 22, 2025
दोन दिवशीय ग्रंथोत्सवाचा समारोप विविध उपक्रमानी संपन्न
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय मार्फत वाशिम ग्रंथोत्सव 2024 चे दिनांक 21 मार्च रोजी परिसंवाद सांस्कृतिक कार्यक्रमांनी यशस्वी समारोप करण्यात आला. दुसऱ्या दिवशीय ग्रंथोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये 21 मार्च रोजी कार्यक्रमाची सुरुवात कथाकथनाने झाली या कथाकथन राजेश ठवकार,अशोक मानकर, श्रीमती सुनिता अवचार, आर. आर.पठाण यांनी कथा सादर केल्या या कथानकांमधून जी कथा सांगणारी आजीबाई आजोबा मोबाईल क्रांतीमुळे लोप पावत आहेत असा सुरू उमटला. ग्रंथ वाचनाचे विविध प्रकारचे फायदे असल्याचे या परिसंवादात सहभागी यांनी बोलताना म्हटले व हा परिसंवाद वाचनाने संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. विजय जाधव या परिसरामध्ये अभिजीत देवगिरीकर प्राचार्य गायकवाड प्राचार्य हर्षा प्रसारकर डॉ.रवी जाधव या परिसंवादामध्ये प्राचार्य हर्षा प्रसारकर यांनी जे वाचतो ते अंतरंगात उतरले पाहिजे आणि पुस्तकाबरोबर माणसे वाचता आली पाहिजे वाचन करणे ही काळाची गरज आहे प्राचार्य गायकवाड यांनी एका शब्दाने या शब्दाच्या वाचनाने क्रांती घडू शकते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका या शब्दामुळे देशामध्ये फार मोठी क्रांती झाली आहे पुस्तकाबरोबर शिल्प सुद्धा वाचता आली पाहिजे असे सांगितले ऍड. उदय कुमारजी सोनवणे एड. उदयकुमार सोनवणे यांनी वाचणाचे त्याचे फायदे सांगताना सांगितले की भजे खात असताना कागदावरील जाहिरात वाचून मी सरकारी वकील झालो वाचनाने जीवनाला सकल होते असे सांगितले प्राध्यापक विजय जाधव यांनी माझा मधील रूढी परंपरा अंधश्रद्धा जर दूर करायच्या असतील वाचन अत्यंत महत्त्वाचे आहे हे शेवटी सांगितले चेतन सेवांकुर दिव्यांग सांस्कृतिक ग्रुप केकतउमरा बाहारदार संगीताचा कार्यक्रम संपन्न झाला देशभक्तीपर महापुरुषां गौरव गीताचा फिल्मी गीतांचा बहारदार कायकम संपन्न झाला त्यानंतर समारोप प्राचार्य अरुणराव सरनाईक जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे विजय पांडे, संघाचे प्रमुख कार्यवाहक प्रभाकरराव घुगे ,प्रा गजानन वाघ,आपल्या अध्यक्ष भाषणांमधून अरुणराव सरनाईक यांनी दोन दिवसाच्या ग्रंथोत्सवाची आयोजन केले या ग्रंथोत्सवाच्या आयोजनांमधून वाशिम करांना ही ग्रंथाची वाचनाची मेजवानी मिळाली असून प्रत्येकाने रोज एक पान वाचन करावे असे सांगितले आभार प्रदर्शन वरीष्ठ लिपिक नवल कवळे यांनी केले
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment