Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Saturday, May 31, 2025

जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त जनजागृती रॅली उत्साहात संपन्न

वाशिम,दि.३१ मे (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय वाशिम अंतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे आयोजन करण्यात आले.

अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश पुरी, डॉ. अविनाश झरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय काळे यांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून जिल्हा रुग्णालय वाशिम येथून प्रारंभ करण्यात आला.

या रॅलीत जिल्हा रुग्णालय वाशिम येथील आरोग्य कर्मचारी, शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालय वाशिम, बाकलीवाल विद्यालय वाशिम (एनसीसी कॅडेट), विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले. रॅलीच्या माध्यमातून तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यात आली. हातात फलक, घोषवाक्य आणि जनजागृतीपर घोषणा देत ही रॅली शहरातील अकोला नाका, पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वाशिम बस स्थानक या प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आली.

रॅलीच्या शेवटी उपस्थितांना तंबाखूचे दुष्परिणाम, व्यसनमुक्तीसाठीचे उपाय आणि तंबाखूविरोधी कायद्यांविषयी माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये तंबाखूविरोधात जागरूकता निर्माण करून आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळण्याचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी "तंबाखू विरोधात लढा देण्याची" शपथ घेतली.

हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. आदित्य पांढरकर (जिल्हा सल्लागार), राम सरकटे (मानसशास्त्रज्ञ), रामकृष्ण धाडवे (जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, वाशिम), स्नेहल महले (प्राचार्य, शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालय, वाशिम), साबळे मॅडम, इंगळे मॅडम, अमोल काळे (एनसीसी कार्यक्रम अधिकारी), महाविद्यालयाचे व शालेय विद्यार्थी, पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभाग यांचे मोलाचे योगदान लाभले.

No comments:

Post a Comment

फॉलोअर