Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Saturday, May 31, 2025

पोहरादेवी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती उत्साहात साजरी


पोहरादेवी, दि. ३१ मे (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क) - आज दिनांक ३१/०५/२०२५ रोजी तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सरपंच श्री. विनोद चंदू सिंग राठोड महाराज यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालय परिसरात पार पडले.

यावेळी उपसरपंच श्री. हेमंत राठोड, ग्रामसेवक श्री. शिंदे साहेब, श्री. विजय अनंतकुमार पाटील, श्री. गोविंद महाराज, ग्रामपंचायत सदस्य श्री. सुशील पुसांडे, श्री. किरण दारव्हेकर, श्री. मनोज राठोड, श्री. गजानन भालेराव, सौ. दिपाली विलायतकर, श्री. सुभाष कडेल, श्री. शक्ती राठोड, श्री. सुरेश जाधव, श्री. कृष्णा देवकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत कर्मचारी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर त्यांच्याबद्दल माहिती देत, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर यांचे समाजासाठी केलेले कार्य आणि त्यांच्या आदर्श जीवनशैलीवर प्रकाश टाकत गावकऱ्यांना प्रेरणा देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी उपस्थित नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

No comments:

Post a Comment

फॉलोअर