Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Saturday, May 31, 2025

विकसित कृषी संकल्प अभियानाचा कारंजा येथून शुभारंभ – जैविक शेतीला नवं बळ

वाशिम ,दि.३१ मे (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) विकसित कृषी संकल्प अभियानाचा उत्साही शुभारंभ कारंजा येथील गुरुदेव आश्रम, गौतम नगर येथे  आमदार सईताई डहाके यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच करण्यात आला. संकल्प रथाला हिरवी झेंडी दाखवून अभियानाचा औपचारिक शुभारंभ झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्र, वाशिम येथील वरीष्ठ शास्त्रज्ञ  रविंद्र काळे यांनी केले.
यावेळी 
राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत निवडलेल्या कृषी सखींसमवेत आ.श्रीमती डाहाके यांनी संवाद साधला.कृषी सखीच्या  सक्षमीकरणासाठी ५ दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे आमदारांनी यावेळी सांगितले.

प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांनी मिशनचे उद्दिष्ट, कृषी सखींची भूमिका आणि जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या. प्रशिक्षणामध्ये 
खरीप हंगामाचे नियोजन,माती परीक्षण व लाभार्थी निवड
जैविक संसाधन केंद्राची माहितीचे  सखोल मार्गदर्शन केले. यावेळी 
ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

शेती पुरस्कार प्राप्त शेतकरी रवींद्र गायकवाड यांच्या (गायवळ, कारंजा) शेतात जैविक शेतीची विविध तंत्रे प्रत्यक्ष दाखवण्यात आली. यामध्ये जीवामृत, बीजामृत, गांडूळ खत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, अंडी जनक, अमिनो आम्ल तयार करण्याचे प्रात्यक्षिक कृषी सखींच्या सहभागातून करण्यात आले.

या अभियानाचा उद्देश कृषी सखींच्या माध्यमातून जैविक शेतीचे ज्ञान गावागावात पोहोचवणे, महिलांचा सहभाग वाढवणे आणि ग्रामीण शेती क्षेत्राचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करून विकसित भारताच्या दिशेने पावले उचलणे हा आहे.

कार्यक्रमाला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील श्री. ठाकरे (शास्त्रज्ञ),  निलेश देशमुख (नोडल अधिकारी), श्री. जाधव (मूल्य साखळी तज्ञ), मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

फॉलोअर