Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Saturday, May 31, 2025

कामामध्ये अनियमितता,व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन करत नसल्याने महावितरणचा वरीष्ठ लिपीक निलंबित



यवतमाळ,दि.३१ मे २०२५;( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
         विनापरवानगी कार्यालयात गैरहजर राहणे,व्यवस्थापन तसेच वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न करणे.तसेच कार्यालयीन कामातील अनियमितता असल्याने दारव्हा विभागातील वरिष्ठ लिपीक (मानव संसाधन) रवि जाधव यांना महावितरणच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. अधीक्षक अभियंता प्रविण दरोली यांनी ही कारवाई केली आहे.

       महावितरणच्या दारव्हा विभागातील मानव संसाधन विभागात वरिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत असलेले रवि जाधव यांची वरिष्ठांशी आणि आपल्या सहकार्यांशीही सौजन्यपूर्वक वागणूक नसल्याचे निदर्शनास आले आहे.त्याचबरोबर कार्यालयीन कामकाजाची वेळी सकाळी १०:००  ते संध्याकाळी ६:१५ वाजेपर्यंत असतांना,ते वेळेत कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने कामकाजात अनियमितता आणि प्रलंबित असल्याचे दिसून येते. 

        कार्यकारी अभियंता यांच्या आढावा बैठकित उपस्थित प्रश्नांना उत्तर न देता,महिला कर्मचाऱ्यांबद्दल असंवैंधानिक भाषा वापरत असल्याचेही निदर्शनास आले आहे.वादळ वाऱ्याच्या पार्श्वभूमिवर पुर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये असे स्पष्ट आदेश असतांनाही, दिनांक २४ ते २५ मे दरम्यान विनापरवानगी किरकोळ रजेवर जाणे आणि या काळात व्हॉट्स एप या समाजमाध्यमावर वरिष्ठांंबद्दल स्टेट्स ठेवून अपमानजनक कृत्य करणे आणि शिस्तभंगाची कारवाई करण्याचे पत्र मिळाल्यावरही त्या पत्राला उत्तर न देणे.

        तसेच परिमंडळाचे मुख्य अभियंता यांनी गुरूवार दिनांक २९ मे ला घेतलेल्या दारव्हा विभागाच्या आढावा बैठकितही विना परवानगी गैरहजर राहणे इत्यादी कृत्य हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून महावितरणच्या सेवाविनिमय २००५ चे उल्लंघन करणारे असल्याने महावितरण अश्या कर्मचाऱ्यांना कधीच पाठीशी घालत नाही.त्यामुळे वरिष्ठ लिपीक रवि जाधव यांना पुढील चौकशी होईपर्यंत महावितरणच्या सेवेत राहू देणे हे महावितरणच्या हितसंबंधास आणि कामकाजात बाधा निर्माण करणारे असल्याने महावितरणकडून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर