Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Sunday, June 1, 2025

शेतकऱ्यांसाठी घोर बनलेल्या फुटक्या कालव्याच्या कामाला सुरुवात. रयत क्रांती संघटनेच्या मागणीला यश.


मानोरा:-- तालुक्यात मृदा व जलसंधारण विभागाअंतर्गत असलेल्या अनेक जलप्रकल्पांच्या कालव्यांची दैनावस्था झालेली असून ही कालवे थोडाही पाऊस झाला तरी शेतकऱ्यांच्या शेती नुकसानीस कारणीभूत होत असल्याने सातत्याने नुकसानीस कारणीभूत ठरणाऱ्या कालव्यांची दुरुस्ती करण्याची मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने शासन, प्रशासनाकडे करण्यात आली होती परिणामी चिखली जलप्रकल्पाच्या गळक्या कालव्याच्या दुरुस्तीला प्रशासनाकडून प्रारंभ करण्यात आलेला आहे.
  चिखली जलप्रकल्पाचा कालवा कालबाह्य झालेला आहे.  शेतकऱ्यांच्या शेत सिवारातून हा कालवा जातो त्या शेतकऱ्यांना या कालव्यामुळे फायदा तर काही होत नाही नुकसान मात्र नक्की होत असल्याची प्रचिती जेव्हा केव्हा मोसमी अथवा अवकाळी पाऊस येतो तेव्हा हमखास येते.
गत महिन्याच्या उत्तरार्धात झालेल्या अवकाळी पावसाने जर्जर झालेल्या कालव्याची भिंत फुठून चिखली या गावच्या अनेक शेतकऱ्यांची शेती व माती  खरडून गेली होती या संदर्भात यवतमाळ वाशिम च्या खासदारांकडे रयत क्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्षांच्या वतीने निवेदन देऊन सदरील नुकसानदायक कालवा खरीप हंगामापूर्वी दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली होती.
भविष्यातील नुकसानीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने चिखली येथील फुटलेल्या  कालव्याची दागडूजी करण्याचे काम आजपासून हाती घेतल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष हर्षल देशमुख यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला देऊन समाधान व्यक्त केले आहे.


No comments:

Post a Comment

फॉलोअर