Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Sunday, June 1, 2025

खेळाडूंच्या कुंचल्यातून झळकले पर्यावरणाचे नाना रंग


दिग्रस : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क)
डॉ एपीजे अब्दुल कलाम स्पोर्ट्स अकादमी द्वारा आयोजित गुरुकुल सीबीएसई इंग्लिश मिडीयम शाळेच्या बॅडमिंटन समर कॅम्पमध्ये रंगांची आगळीवेगळी उधळण पहायला मिळाली... ही केवळ चित्रांची स्पर्धा नव्हती तर ती खेळाडूंच्या मनात खोलवर रुजलेल्या पर्यावरणप्रेमाची जिवंत अभिव्यक्ती ठरली.

दिनबाई शाळेच्या बॅडमिंटन सभागृहात आयोजित समर कॅम्पमध्ये फक्त खेळच नाही, तर विद्यार्थ्यांच्या मनोविश्वाचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी विविध उपक्रमांची रचना करण्यात येत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून घेण्यात आलेली चित्रकला स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि संवेदनशीलतेला मिळालेलं व्यासपीठ ठरलं. झाडं, पृथ्वी, नद्या, प्राणी, जल, माती – या साऱ्यांवर प्रेम व्यक्त करत सहभागी खेळाडूंनी आपल्या मनातील पर्यावरणप्रेम कुंचल्यातून साकारलं. काही चित्रांतून 'जल ही जीवन हैं' ‘वृक्ष लावल्या शिवाय भविष्यात श्वास घेणंही कठीण होईल’ हा संदेश दिसून आला, तर काही चित्रांतून ‘स्वच्छ पर्यावरण हेच जीवन’ याची जाणीव झाली. यावेळी मॉनिटर क्लब शाळेचे अनुभवी कला शिक्षक अजय बोरळकर आणि गुरुकुल शाळेचे आर्ट अँड क्राफ्ट टिचर सचिन गोंधळेकर यांनी विद्यार्थ्यांना केवळ चित्रकलेचे मार्गदर्शनच दिले नाही, तर पर्यावरणाविषयी असलेली आपली कळकळही त्यांच्या मनात बिंबवली. 
डॉ कलाम स्पोर्ट्स अकादमी व गुरुकुल सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूलचे उपप्राचार्य शरीफ शेख, खेळाडूंना नियमित मार्गदर्शन करणारे शाळेचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक, अष्टपैलू ॲथलिट आसिफ काझी, खोखो प्रशिक्षक फारूक चव्हाण, कबड्डी कोच सादिक गारवे सर, स्केटिंग एक्सपर्ट अजीम शेख, आशिष अगलदरे तसेच विद्यापीठ कलर कोट प्राप्त खेळाडू साक्षी जाधव यांच्या सहकार्याने कला आणि क्रीडा यांची अशी सुंदर सांगड घालणारे हे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता आणि जबाबदारीची भावना जागवणारे ठरत आहेत. शिबिराला आणि विविध स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर