दिग्रस:(साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
शहरातील पुसद पुलाच्या बाजूला मोठा जीवघेणा आहे. या नाल्यामध्ये आतापर्यंत अनेक अपघात झाल्यामुळे या उघड्या नाल्यावर स्लॅब टाकण्यात यावा यासाठी या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे उपशहर प्रमुख नितीन सोनुलकर यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नाने या जीवघेण्या नाल्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
दिग्रस पुसद पूल बांधकाम झाल्यानंतर शहराततील सर्व नाल्याचे पाणी सरळ धावंडा नदीत जावे तसेच पावसाचे पाणी सुद्धा नदीमध्ये प्रवाहित करण्याकरता पुलाच्या दुतर्फा मोठे नाले तयार करण्यात आले होते. परंतु तत्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी अतिक्रमणाचे कारण देत या नाल्यावरील स्लॅब तोडले होते. त्यानंतर या नाल्यात पडून अनेकांचे अपघात झाले. मागील महिन्यात येथील एक शिंदे नामक इसम या नाल्यात कोसळून त्यांचे दोन्ही हात पाय फ्रॅक्चर झाले. अशा विविध घटना व अपघात ही येथे नित्याची बाब झाली होती. परिसरातील नितीन सोनुलकर यांनी ही गंभीर बाब हेरून पाठपुरावा करून पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे अर्जाद्वारे या नाल्यावर स्लॅब टाकण्याची मागणी केली व या गंभीर बाबीची दखल घेत पालकमंत्र्यांनी त्वरित या नाल्यावर स्लॅब टाकण्याचे आदेश दिले. नितीन सोनुलकर यांनी मुख्याधिकारी अतुल पंत यांच्याकडे नियमित पाठपुरावा करून हे काम तडीस नेले. हे काम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख हरिहर लिंगणवार यांचे सुद्धा महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. नागरिकांची ही फार मोठी समस्या दूर केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
No comments:
Post a Comment