Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Monday, July 14, 2025

व्हॉइस ऑफ मीडियाच्या तालुकाध्यक्षपदी धर्मराज गायकवाड तर सचिवपदी आजीस शेख. पत्रकार, जनसामान्यांच्या हक्कांसाठी सक्रिय भूमिका बजावणार - नव्या कार्यकारिणीचा संकल्प




दिग्रस : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)पत्रकारांच्या हक्कांसाठी आवाज उठवणारी अग्रगण्य राष्ट्रीय स्तरावरील संघटना असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ दिग्रस तालुका शाखेची नवी कार्यकारिणी औपचारिकरित्या गठीत करण्यात आली आहे. या बैठकीत पत्रकार बांधवांनी एकत्र येऊन नव्या कार्यकारिणीला एकमुखी पाठिंबा दर्शवला.

             या कार्यक्रमाचे आयोजन दिग्रस शहरात करण्यात आले होते. यावेळी संघटनेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य जय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीसह अनेक नामवंत पत्रकार आणि इलेक्ट्रॉनिक, प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी दिग्रस तालुकाध्यक्षपदी धर्मराज गायकवाड, उपाध्यक्ष प्रशांत झोळ,सचिव आजीस शेख,कार्याध्यक्ष सैय्यद शोएब,प्रसिद्धी प्रमुख साजिद पतलेवाले,संघटक सदानंद जाधव,कायदेशीर सल्लागार ऍड.वैभव गव्हाणे आणि सदस्य म्हणून जुबेर खान,पृथ्वीराज चव्हाण,विठ्ठल राठोड,संतोष राठोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

कार्यक्रमात नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या कार्याची माहिती देताना सांगितले की, "पत्रकारांना न्याय मिळवून देणे, स्थानिक प्रशासनासोबत समन्वय ठेवून पत्रकार सुरक्षेची मागणी करणे, विविध योजनांची अंमलबजावणी आणि नवीन पत्रकार बांधवांना मार्गदर्शन करणे" हे आपले प्रमुख उद्दिष्ट राहील.

संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा देत सांगितले की, “पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. त्यांच्या हक्कांचे संरक्षण होणे अत्यंत आवश्यक आहे. व्हॉइस ऑफ मीडियाचा हेतू केवळ संघटना वाढवणे नसून, पत्रकारांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणे हे आमचे ध्येय आहे.”

No comments:

Post a Comment

फॉलोअर