मानोरा तालुका : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
मौजा चिखली येथे दिनांक ५ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद शाळा परिसरात पांनंद रस्ते, शिवार रस्ते व शेतातील रस्ते या संदर्भात महत्त्वाचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात मौज्यातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
सदर बैठकीत शासन निर्णयानुसार शेतरस्त्यांवरील अडचणी, नकाशावरील रस्ते, अतिक्रमित रस्ते तसेच वहिवाटीत असलेले पण नकाशावर नसलेले रस्ते याबाबत चर्चा घेण्यात आली. शेतकऱ्यांना आपापल्या अडचणी मांडण्यासाठी तसेच शेतरस्त्यांबाबत आदेश झाल्यास ते सादर करण्यासाठी संधी देण्यात आली.
यानंतर संबंधित नकाशे व ७/१२ उताऱ्यांच्या आधारे शिवार फेरी घेऊन उपस्थित मुद्द्यांवर निर्णय घेण्यात येणार आहे, असे ग्राम महसूल अधिकारी यांनी स्पष्ट केले. तसेच “आजच्या चर्चासत्रानंतर मांडण्यात आलेल्या अडचणींचीच नोंद घेतली जाणार असून, त्यानंतर कोणतीही दखल घेतली जाणार नाही” असेही स्पष्ट करण्यात आले.
शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी ठरणाऱ्या पांनंद व शेतरस्त्यांबाबत शासनस्तरावर सुरू असलेल्या या प्रक्रियेत शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.यावेळी महसूल अधिकारी चौधरी यांनी सविस्तर माहिती देऊन शेतकऱ्यांना काही बोलावयास असल्यास मत जाणून घेतले. स्वातंत्र्य प्राप्ती पासून प्रचंड चिखल तुडवीत जाणारे भोगारा शिवारातील शेतकऱ्यांनी आता आपला रस्ता होणार हे आसेचे किरण दिसत आहे.हे विशेष ..
No comments:
Post a Comment