Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Sunday, September 21, 2025

प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेत जिल्ह्यात २७ मेगावॅट वीज निर्मिती. ६ हजार ८७७ ग्राहक झाले वीजेबाबत आत्मनिर्भर



यवतमाळ, दि.२१ सप्टेंबर २०२५; साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
        प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेत महावितरण यवतमाळ जिल्ह्यातील ६ हजार ८७७ ग्राहक वीजे बाबत आत्मनिर्भर झाले ,असून त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनेलच्या माध्यमातून २६.६३ मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. ७८ हजार रूपयापर्यंत अनुदान असलेल्या या योजनेत वीज ग्राहकांना शुन्यापर्यंत वीजबिल करणे शक्य असल्याने,जिल्ह्यातील जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अधीक्षक अभियंता प्रविण दरोली यांनी केले आहे.

      दरमाह तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेस वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. वर्षभरात या योजनेचा जिल्ह्यातील ६ हजारापेक्षा जास्त ग्राहकांनी लाभ घेतला आहे.

        घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिट वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत मिळत आहे. घरगुती वीज ग्राहकांना छतावर सौर ऊर्जानिर्मिती संच बसवता यावा यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे तसेच कर्जाची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यास ग्रामीण ग्राहकांना प्रोत्साहन देणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन निधीही देण्यात येणार आहे. याबरोबरच महावितरणकडून १० किलोवॅटपर्यंतच्या अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे तसेच सौर नेट मीटरदेखील उपलब्ध करून देण्यात येत आहे.

     योजनेत कार्यान्वित झालेल्या सौर प्रकल्पांतून निर्माण झालेली वीज ग्राहकांना वापरता येते. शिवाय ग्राहकाची गरज भागवून वीज शिल्लक राहिल्यास महावितरणकडून ती विकत घेण्यात येत आहे. त्याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जात आहे.

       छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे.

          पीएम-सूर्यघर मोफत योजनेच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर प्रकल्प बसवण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. वीज ग्राहकांना https://www.pmsuryag
har.gov.in या संकेत स्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध आहे.
000000

कोट
पीएम-सूर्यघर मोफत योजनेत सौर ऊर्जा संच बसवणाऱ्या ग्राहकांना जवळपास मोफत वीज मिळत आहे. शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या या योजनेचा घरगुती ग्राहक व निवासी संकुलांनी लाभ घ्यावा. महावितरणकडून यासंबंधीच्या सर्व प्रकिया ऑनलाईन व सुलभ करण्यात आली आहे.
           मुख्य अभियंता,अशोक साळुंके

No comments:

Post a Comment

फॉलोअर