Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Saturday, September 20, 2025

मानोऱ्यात ६०वा श्रीगुरु सत्संग सोहळा संपन्न ज्ञानेश्वरीतील १४वा अध्याय, ओवी ३९१ वरील विचारमंथन; संत मंडळींकडून ह.भ.प. शिवलाल महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली

मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) :
श्री गुरु सत्संग समिती, मनोरा तालुका यांच्या वतीने आयोजित ६०वा सत्संग सोहळा ह. भ. प. राजगुरे महाराज सावळी यांच्या घरी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गुरुवर्य प्रेमसिंग महाराज (चिखली) यांनी भूषविले.

या प्रसंगी ज्ञानेश्वरीतील अध्याय १४, ओवी ३९१ – “प्रति बिंबौनी बिंबवरी प्रभूची जैसी उजरी, ते सोहमवृत्ती अवधारी, तैसी होय” – या ओवीवर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

संतमंडळींमध्ये अण्णासाहेब पाटील, जगदीश महाराज, खोडे महाराज, प्रभाकर गावंडे, भीमराव महाराज, दादाराव महाराज, मिटकरी सर, गोपाल राठोड, बी. बी. पाटील सर, अनिल बाबू देशमुख, बादल डोंगरे, हिम्मत महाराज, ज्ञानेश्वर खोडे, खेमसिंग महाराज, गोपीचंद महाराज आदींचा सहभाग होता.

यावेळी उपस्थित सर्व भागवतकार, कीर्तनकार, प्रवचनकार व संत मंडळींनी कबीरपंथीय धर्मप्रसारक गुरुवर्य शिवलाल जी महाराज विठ्ठलवाडीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुवर्य प्रेमसिंग महाराज यांनी आपले विचार व्यक्त करून आजवर विविध पंथांच्या संतांबरोबर झालेल्या आध्यात्मिक चर्चांचा आढावा उपस्थितांना दिला.

No comments:

Post a Comment

फॉलोअर