मानोरा दि. २२ सप्टेंबर : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी करत आज सोमवार, दि. २२ सप्टेंबर २०२५ रोजी मानोरा तहसील कार्यालयात सकल धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
२०१४ साली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी बारामती येथे धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन तत्काळ पाळून आरक्षण जाहीर करावे, तसेच जालना येथे उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांचे सुरू असलेले आमरण उपोषण तात्काळ सोडवावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
निवेदन देताना सकल धनगर समाजाचे विजय अनंतकुमार पाटील, नरेंद्र डाखोरे, वासुदेवराव खोंड, सुभाष ढोरे, संजय अलदर, खुशालराव पुसांडे महाराज, वासुदेव काजळे, राजेश्वर चव्हाण, शाम डोळस, देवराव खोडके, संतोष पुसांडे, अनिकेत लवटे, सुरेश परांडे, गणेश पिंगाणे, दिनेश पाटील, पवन मात्रे, देवराव पिंगाणे, अजय ढोके, अक्षय पुसांडे, राजेंद्र पुसांडे, गोलू पोले, अजय परांडे, अभिजित डाखोरे, जयवंत मात्रे, नंदु वावडे, विलास काजळे, गणेश ढोके, ज्ञानेश्वर खोडके, गजानन सिडाम, मनोज डांबरे, राजू मात्रे, नरेंद्र काजळे, हिरामण पिंगाणे, अमोल ढोके, महेश परांडे, निखिल परांडे आदींसह मोठ्या संख्येने धनगर समाजबांधव उपस्थित होते.
No comments:
Post a Comment