Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, September 5, 2025

कॉन्व्हेन्ट ऑफ स्कॉलर्स व जे.एस. पब्लिक स्कूलमध्ये स्वयंशासन दिन उत्साहात. विद्यार्थ्यांनी घेतली शाळेची सूत्रे; मिताली राठोड प्राचार्य, तन्मय पडवाळ उपप्राचार्य


मानोरा :( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क)
मानोरा येथील कॉन्व्हेन्ट ऑफ स्कॉलर्स अँड इंग्लिश प्रायमरी स्कूल तसेच जे.एस. पब्लिक स्कूल मध्ये स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षक व प्रशासकाची जबाबदारी स्वीकारत उत्साहात हा दिवस पार पाडला.

कार्यक्रमाचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष व प्राचार्य . सुनिल हनुमंते यांनी भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून केला. यानंतर शिक्षक दिनाला हिरवी झेंडी दाखवून स्वयंशासन दिनाची सुरुवात करण्यात आली.

कु. मिताली राठोड हिची प्राचार्य तर तन्मय पडवाळ यांची उपप्राचार्य म्हणून निवड झाली. दिवसभर त्यांनी शाळेचे सर्व कामकाज पाहून खरी स्वयंशासनाची अनुभूती दिली.

नर्सरी ते पाचवी पर्यंतच्या वर्गात विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका निभावली. यात रुशाली राठोड, निधी राठोड, आरोही जाधव, सृष्टी जाधव, पल्लवी राठोड, प्रणव राठोड, नयन राठोड, पीयुष जाधव, आयुष जाधव, धनश्री राठोड, आईशेस राठोड, अक्षरा राठोड, अनन्या भोरकडे, आस्था जाधव, ईश्वरी रनमले, वेदिका नाईक, रुद्रांश टाले आदींचा सहभाग होता. तर तृप्ती पाटील हिने शिपाईची जबाबदारी पार पाडली.

या वेळी शाळेचे संचालक प्रा. अनिल चव्हाण, रक्षा राऊत, शिवानी उमरे, राजेश राठोड, सीमा चव्हाण, अभिजीत डेरे, मयुरी राठोड, रुपाली मांजरे, कोमल भुसारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागामुळे स्वयंशासन दिन अविस्मरणीय ठरला.

No comments:

Post a Comment

फॉलोअर