वाशिम,दि.२८ नोव्हेंबर (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) मतदान प्रक्रिया ही लोकशाहीला परिपक्व करणारी आहे. आपले मतदान आपले अधिकार वापरणे हे आपले अस्तित्व सिद्ध करण्याची सुवर्णसंधी आहे.त्यामुळे २ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने आपल्या अधिकार बजावून लोकशाहीला बळकट करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.
मतदानाचा दिवस हा सण आणि उत्सव सारखा साजरा करावा. प्रत्येक मतदाराने स्वतःही मतदान करावे आणि आपल्या ओळखीतल्या सर्व पात्र मतदारांना मतदान करण्यास प्रेरित करावे असेही जिल्हाधिकारी श्री . कुंभेजकर यांनी आवाहन केले आहे.
जिल्हा प्रशासन या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकात जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे.
मतदान जनजागृती साठी फक्त शासकीय यंत्रणाच नव्हे तर शाळकरी विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे. अनेक शाळांमधून महाविद्यालयांमधून जनजागृती रॅली काढण्यात आली.
गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यातील सर्व यंत्रणा मतदान टक्केवारी वाढीसाठी विविध माध्यमातून जनजागृती करत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने २ डिसेंबर रोजी आपले मत देऊन यशस्वी करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment