दिग्रस (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) — वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार व कार्य गावागावात पोहोचावे तसेच लहान मुलांमध्ये सुसंस्कारांची रुजवणूक व्हावी, या उदात्त हेतूने अ. भा. गुरुदेव सेवाश्रम, मोझरी यांच्या अंतर्गत दिग्रस येथे अ. भा. गुरुदेव सेवा मंडळाची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. ही निवड प्रक्रिया दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी गजानन महाराज मंदिर, दिग्रस येथे पार पडली.
या वेळी सर्वानुमते प्रकाश गोविंदराव दाभाडकर यांची तालुका सेवाधिकारी म्हणून निवड करण्यात आली. तसेच तालुका प्रचार प्रमुख म्हणून राजाभाऊ तुकाराम चव्हाण, उपप्रचार प्रमुख म्हणून संजय ज्ञानोबा मस्के, सचिव म्हणून देविदास पांडूरंगजी वानखडे, संघटक म्हणून प्रशांत दादाराव शिंदे, भजन प्रमुख म्हणून रवींद्र सूर्यभानजी बदुकले, महिला भजन प्रमुख म्हणून सौ. ललिता महादेव काळबांडे, प्रसिद्धी प्रमुख म्हणून रामनाथ बाबाराव शेंबडे यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून गणेश ना. गिरी, चेतन स. जाधव, कैलास जा. राठोड आणि ज्ञानेश्वर क. भारस्कर यांचीही सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून गुरुदेवांचे विचार, ग्रामस्वच्छता, श्रमसंस्कार, भजन-प्रवचन व सामाजिक प्रबोधनाचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
No comments:
Post a Comment