Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Tuesday, February 10, 2026

सायबर सुरक्षिततेसह एआयच्या जबाबदार वापराचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांचे आवाहनसुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न


वाशिम, दि. १० फेब्रुवारी (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
 डिजिटल तंत्रज्ञानामुळे दैनंदिन जीवन सुलभ झाले असले तरी त्यासोबत सायबर धोकेही वाढले आहेत. प्रत्येक नागरिकाने इंटरनेटचा वापर करताना सतर्कता बाळगणे, वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे, तसेच सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा जबाबदारीने वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग विकासासाठी महत्त्वाचा असला तरी त्याचा गैरवापर टाळण्यासाठी सजगता व नैतिकतेचे पालन करणे गरजेचे आहे, असे त्यांनी प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी केले.

इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून डिजिटल व्यवहार तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा वापर दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेतील स्व. वसंतराव नाईक सभागृहात जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी ‘सुरक्षित इंटरनेट दिन’ साजरा केला जातो. यावर्षी या दिनाची संकल्पना ‘Smart Tech, Safe Choices – Exploring the Safe and Responsible Use of AI’ अशी असून, महिला, विद्यार्थी, युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षित इंटरनेट वापर, सायबर स्वच्छता (सायबर हायजीन) आणि सायबर धोक्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला.

या कार्यशाळेमध्ये माहिती सुरक्षा शिक्षण व जनजागृती प्रकल्पाच्या माध्यमातून इंटरनेटचा सुरक्षित वापर, सायबर फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाच्या खबरदाऱ्या, डिजिटल आर्थिक व्यवहारांची सुरक्षितता तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीने वापर याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्हा सूचना व विज्ञान केंद्र (एनआयसी) मार्फत देण्यात येणाऱ्या इंटरनेट सुरक्षेबाबत प्रशिक्षणात  मजबूत पासवर्डचा वापर, दोनस्तरीय प्रमाणीकरण, संशयास्पद दुवे व संदेशांपासून सावध राहणे तसेच सायबर गुन्ह्यांची तात्काळ तक्रार नोंदविण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.

या प्रसंगी जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी जयेश खंडारे, सहाय्यक जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी नेमसिंग तोमर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत ,सायबर विभागाचे सुशील बोरकर यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी  उपस्थित होते.

ही जनजागृती मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व शासकीय विभाग, संस्था व सहभागी नागरिकांचे आभार व्यक्त करत जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी खंडारे यांनी सुरक्षित व जबाबदार इंटरनेट वापराबाबत सातत्याने जागरूक राहण्याचे आवाहन केले.

No comments:

Post a Comment

फॉलोअर