Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Tuesday, February 10, 2026

भाविकांच्या सुविधेसाठी सूक्ष्म नियोजन करा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकररामनवमी यात्रोत्सव २०२६ अनुषंगाने जिल्हास्तरीय आढावा बैठक

वाशिम, दि. १० फेब्रुवारी (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) रामनवमी यात्रोत्सवाच्या कालावधीत भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन यात्रेचे आयोजन शिस्तबद्ध, सुरक्षित व सुव्यवस्थित पद्धतीने होण्यासाठी व भाविकांच्या सुविधेसाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.

येत्या २६ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या रामनवमी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात जिल्हास्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, विधान परिषद सदस्य आ.महंत बाबूसिंग महाराज यांचे प्रतिनिधी यांच्यासह विविध संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 

यात्रोत्सवाच्या कालावधीत भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती अपेक्षित असल्याने सुरक्षितता, वाहतूक नियोजन, गर्दी व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, विद्युत पुरवठा तसेच अग्निशमन व आपत्कालीन सेवांची पूर्वतयारी वेळेत पूर्ण करण्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी भर दिला. कोणत्याही अनुचित घटनेस प्रतिबंध करण्यासाठी सर्व यंत्रणांनी दक्षता बाळगून नियोजनानुसार कार्यवाही करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

पोलीस प्रशासनाने संवेदनशील ठिकाणी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून बंदोबस्त ठेवावा. आरोग्य विभागाने प्राथमिक उपचार केंद्र, रुग्णवाहिका व वैद्यकीय पथके सज्ज ठेवावीत. सार्वजनिक बांधकाम व ग्रामविकास विभागाने रस्ते, प्रकाश व्यवस्था व तात्पुरत्या संरचनांची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. नगर परिषद व संबंधित स्थानिक संस्थांनी स्वच्छता, कचरा व्यवस्थापन तसेच शौचालयांची पुरेशी व्यवस्था करावी, असे निर्देश देण्यात आले.

बैठकीत एस.टी. बसेसच्या अतिरिक्त फेऱ्या, राज्य उत्पादन शुल्क विभागाची गस्त, बोकड बळी संदर्भातील नियमांचे पालन, बॅनर व साऊंड सिस्टीमचे नियमन, विविध पथकांची नियुक्ती, आवश्यक ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था, मंदिर परिसरातील पोलीस बंदोबस्त, मोबाईल शौचालये व स्नानगृहे, मोबाईल टॉवर कंपन्यांशी समन्वय, जनावरांचे लसीकरण, पाणी शुद्धीकरण, हॉटेल्सची तपासणी तसेच योग्य बॅरिकेडींग आदी मुद्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.

यात्रोत्सवाच्या कालावधीत संबंधित यंत्रणांना नेमून दिलेल्या जबाबदाऱ्यांचे काटेकोर पालन सुनिश्चित करून सर्व कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

काही अधिकारी दुरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.पोहरादेवी व उमरी येथील मंदिर समितीचे ट्रस्टी देखील उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

फॉलोअर