मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क)
शेतकरी शेतमजूर तथा शेती व्यवसायावर उपजीविका असलेल्या कष्टकरी, व्यवसायिक, व्यापारी, अनाथ, दिंव्यांग,महिला, विधवा या सर्वांच्या हिताला प्राधान्य देऊन प्रत्येक अधिवेधनात सभागृहात व सभागृहाबाहेर रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारनारे माज़ी आमदार बच्चुभाऊ कडू यांची ज़ाहिर सभा येत्या गुरुवारी दिनांक 12 फेब्रूवारी रोजी कारखेड़ा येथील भव्य सभागृहात होत असल्याचे सर्व शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने संयोजक डॉ. विट्ठल घाटगे, नामा जाधव, श्याम पवार, गजानन अमदाबादकर, हर्षल देशमुख, राजकुमार दिघडे,किशोर ठाकरे यांच्या वतीने अधिकृत कलविले आहे.
गेल्या काही वर्षांपासून वैश्विक तापमान बदलामुळे येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी, अवर्षण, पावसातील खंड, तर कधी अवकाळी पावसामुळे दरवर्षी पिकांची प्रचंड हानी होते. त्यावर उपाय म्हणून सरकारने आणलेल्या पिकविमा व इतर योजनांचा फायदा शेतकऱ्यांऐवजी कंपन्यानाच होत असल्याचे सिद्ध झाले आहे. रानटी प्राण्यांचे नवे जीवघेणे संकट आले आहे.
वरील सर्व संकटावर मात करून हाती आलेले पीक शेतकरी विरोधी सरकारी धोरणामुळे मातीमोल भावात विकावे लागते. परिणामी कर्जबाजारी झालेला शेतकरी आत्महत्या करतो हे सध्याचे भयंकर वास्तव्य आहे. कर्जाची परतफेड करू न शकल्यामुळे आतापर्यंत महाराष्ट्रात जवळपास 35 हजार शेतकऱ्यांनी स्वतःचे आयुष्य संपविले आहे तर जवळपास रोज 09 शेतकरी कर्ज परतफेड न करू शकल्यामुळे आत्महत्या करतात. त्यांची कुटुंबे पोरकी जाली असुन मुले अनाथ जाली आहे. मोठमोठ्या बोटावर मोजता येणाऱ्या आणि गडगंज संपत्ती असणाऱ्या व्यापाऱ्यांना शासनाने 16 लाख कोटी रूपयाचे कर्ज माफ केले आहे. परंतु आत्महत्या करणाऱ्या गरीब शेतकरी वर्गाची संपूर्ण कर्जमुक्ती करण्यास शासन तयार नाही. वर्तमान काळात शेतकऱ्यांसाठी आवाज बुलंद करणारा एकही राजकीय पक्ष व नेता उरलेला नाही.त्यामुळे शेतकरी,अपंग,अनाथ,
महिला यांचा आवाज बुलंद करून वाघाची डरकाळी फोड़नारा नेता, कैवारी म्हणून बच्चुभाऊ कडू यांचे नाव शेतकरी वर्गासमोर आहे.
बच्चुभाऊ कडू यांनी नागपुर येथे लाखो शेतकऱ्यांसमवेत महाराष्ट्र जाम करून शासनाकडून कर्जमुक्तीची अंतीम तारीख 30 जून कबूल करवून घेतली आहे. कर्जमुक्तीच्या विषयावर समिती गठीत जाली असुन अभ्यास करने सुरु आहे. शासन खूप चालाक असते. शासनाने दिलेला शब्द पाळला पाहिजे यासाठी सगळ्या शेतकरी बंधु भगिनींच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या सभेमध्ये माज़ी आमदार बच्चुभाऊ कडू हे शेतकरी बंधु भगिनींसोबत सरळ सरळ संवाद साधनार असुन शासन कोणाची कर्जमुक्ति करणार? कधी करणार? किती करणार?चालू आर्थिक वर्षाचे क़ाय होणार? कर्जमुक्तीचे निकष क़ाय असणार इत्यादि विषयावर इतंम्भुत माहीती देणार आहेत.
त्यामुळे या जाहीर सभेला शेतकरी कार्यकर्त्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन, शेतकरी संघटना, प्रहार संघटना, रयत क्रांती संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, क्रांतिकारी शेतकरी संघटना भूमिपुत्र शेतकरी संघटना, तांडा सुधार समीती, स्वतंत्र भारत पक्ष, किसान ब्रिगेड, विदर्भ राज्य आंदोलन समीती, कन्हैया ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे. शेतकरी हितासाठी लढनाऱ्या सर्वच संघटनेचे नेते या सभेला उपस्थित राहणार असल्यामुळे ही सभा यशस्वी होण्यासाठी
डॉ.विट्ठल घाटगे, गजानन अमदाबादकर, नामा बंजारा/ जाधव, श्याम पवार, हर्षद देशमुख, किशोर तापड़िया, राजकुमार दिघडे, विट्ठलराव गावंडे,राजू अवताडे, सतीश देशमुख, अजय चौरे, चेतन पवार, रामराव चव्हाण, विलास राठोड, रितेश घाडगे, बंडु कोल्हे, धर्मराज आड़े, हिम्मत गावंडे,प्रेम पवार, दिपक देशमुख, विशाल ठाकरे,डॉ. चंदनशिवे, रामराव मिसाल, इंदल पवार, राजू रत्ने, भारत भगत,भूषण मुराले,श्रीधर चव्हाण, अण्णा सुरजुसे, बबनराव पाटील आणि वाशिम जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना एकत्रित येऊन गलोगल्ली परिश्रम घेत आहेत.
No comments:
Post a Comment