Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, February 27, 2026

मानोरा तालुक्यातून संचालक पदासाठी ५ उमेदवार रिंगणात. ३४ प्रतिनिधी मतदार ठरवणार बँकेचा नवा डायरेक्टर


मानोरा, दि. — :  (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी मानोरा तालुक्यातून निवडणुकीची चुरस वाढू लागली आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी, म्हणजेच २७ रोजीपर्यंत तालुक्यातील एकूण पाच उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
या निवडणुकीत मानोरा तालुक्यातून राणी उमेश ठाकरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, डॉ. श्याम जाधव (नाईक), इंदूबाई नीलकंठ पाटील आणि श्याम राठोड यांनी निवडणूक अधिकारी, अकोला यांच्याकडे आपले नामांकन अर्ज दाखल केले आहेत.
नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत ४ मार्च ते १८ मार्च दरम्यान असून, या कालावधीत कोण उमेदवार माघार घेणार याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. अंतिम उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर निवडणुकीतील प्रत्यक्ष लढतीचे स्वरूप स्पष्ट होईल.
दरम्यान, सहकार क्षेत्रातील या महत्त्वाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मानोरा येथे माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे आणि माजी वीज मंडळ सदस्य अनिल राठोड यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत आघाडीचा अधिकृत उमेदवार उभा करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
बँकेच्या संचालक पदासाठी ३४ प्रतिनिधी मतदार मतदान करणार असून, ही निवडणूक दुहेरी चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सहकार क्षेत्रात या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर